महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूरकायस्थ यांच्या मुक्ततेचा आदेश

06:54 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : युएपीए अंतर्गत न्यूजक्लिकच्या संपादकाला अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने न्यूजक्लिकचे संस्थापक संपादक प्रबीर पूरकायस्थ यांना मोठा दिलासा दिला आहे. युएपीएच्या कठोर कलमांच्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या पूरकायस्थ यांची जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुक्ततेचा आदेश देत पोलिसांच्या कार्यपद्धतींवर गंभीर टिप्पणी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी पूरकायस्थ यांच्या अटकेनंतर त्यांना वकिलाला न कळविता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याची घाई का केली असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला. युएपीएच्या कठोर तरतुदींच्या अंतर्गत पूरकायस्थ यांना ताब्यात घेण्यात आले होते.

न्यायाधीश बी.आर. गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने बुधवारी पूरकायस्थ यांच्या जामिनावरील मुक्ततेचा आदेश दिला आहे. पूरकायस्थ यांच्यावर देशविरोधी दुष्प्रचाराला बळ पुरविण्यासाठी चीनकडून निधी प्राप्त केल्याचा गंभीर आरोप आहे. प्रबीर पूरकायस्थ यांनी युएपीएच्या अंतर्गत झालेल्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  आता त्यांची याचिका मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने मुक्ततेचा आदेश दिला आहे. अटकेवेळी पूरकायस्थ यांना पोलिसांनी अटकेचे कारण सांगितले नव्हते. याचमुळे पूरकायस्थ हे जामिनास पात्र ठरतात असे खंडपीठाने म्हटले आहे.

चीनकडून वित्तपुरवठा प्राप्त करत न्यूजक्लिकडून भारतविरोधी दुष्प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पूरकायस्थ यांना 3 ऑक्टोबर 2023 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना 4 ऑक्टोबर रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मार्च महिन्यात 8 हजार पानी आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी न्यूजक्लिकचे एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांनाही अटक केली होती. चक्रवर्ती यांना 6 मे रोजी जामीन मिळाला होता. न्यूजक्लिकला चीनकडून वित्तपुरवठा होत असल्याचा दावा द न्यूयॉर्क टाइम्सकडून करण्यात आला होता. यानंतरच दिल्ली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article