पावसाचा जोर मंदावला आज ऑरेंज अलर्ट जारी
वाळपईत आतापर्यंत रेकॉर्डब्रेक 134.50 इंच : आतापर्यंत राज्यात 56 टक्के जादा
पणजी : गोव्यात पावसाचा जोर मंदावला असून गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 1.25 इंच एवढी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 4 इंच पाऊस वाळपईत पडला. पुढील दोन दिवसांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला व येलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये उत्तर गोव्यात थोडा जादा पाऊस पडला. दक्षिण गोव्यात फारच कमी पावसाची नोंद झाली. म्हापसा 0.75, पेडणे 1.50, फोंडा 1 इंच, पणजी 1.25, जुने गोवे 1.80, सांखळी 1.50, वाळपई 4, मुरगाव 1.50, केपे 1.25, काणकोण, दाबोळी व मडगाव येथे प्रत्येकी 1 से.मी एवढी अत्यल्प पावसाची नोंद झाली. आज शुक्रवार दि. 26 जुलै रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर दि. 29 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, यंदाच्या मौसमात आतापर्यंत गोव्यात 110.50 इंच पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 56 टक्के जादा पाऊस झाला आहे. वाळपईत आतापर्यंत रेकॉर्डब्रेक 134.50 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.