Maharashtra weather | पुणे, सातारा, सांगली अन् सोलापूरला उद्या 'ऑरेंज अलर्ट'; गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा!
राज्यात अवकाळीचा मुक्काम; पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटीचे संकेत
पुणे -राज्याच्या बहुतांश भागात सोमवारी गारांचा पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. दरम्यान, उद्या मंगळवारी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत गारपिटीसह अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यातआला आहे. दरम्यान, पावसामुळे कमाल तापमानात घट होणार आहे.
पश्चिम विदर्भ पासून, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत ट्रफ पसरला आहे. यामुळे राज्याच्या अनेक भागांत सोमवारपासून पावसाची तीव्रता वाढली आहे. यात पुण्यासह अनेक जिल्ह्यांत गारपीट देखील झाली. सकाळपासून उन्हाचा कडाका, तर दुपारनंतर अनेकतापमानात घट, मगळवाराहा अनेक जिल्हयांत गारपिटीचा इशारा, देशात-राज्यात पाऊसभागात पावसाला सुरुवात झाली. सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह आदी राज्यांत दुपारनंतर पावसाची तीव्रता अधिक होती. गारपीटीमुळे पिकांची हानी झाली असून, मंगळवारीही अनेक भागात गारपिटीचा इशारा असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.