महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युरोपियन फेडरेशनचा विरोध

06:22 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ सोफिया (बल्गेरिया)

Advertisement

रशिया आणि बेलारुसच्या जिमनॅस्टचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुनरागमन करण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये युरोपियन जिमनॅस्टिक फेडरेशनच्या नियंत्रण समितीने विरोधात मतदान केले. त्यामुळे आता 2024 साली पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी नवी समस्या निर्माण झाली आहे.

Advertisement

रशिया आणि बेलारुसच्या अॅथलिट्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुनरागमन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक फेडरेशनने काही अटी घातल्या होत्या. या दोन्ही देशांचे अॅथलिट्स वैयक्तिक त्रयस्त अॅथलिट्स म्हणून तसेच त्यांना 1 जानेवारीपासून कोणत्याही राष्ट्रीय चिन्ह किंवा प्रतिकाशिवाय सहभागी होण्याची परवानगी दिली होती. आणि यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून या दोन्ही देशांच्या जिमनॅस्टना ऑलिम्पिक स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी शिफारस करण्यात आली होती. या समस्येवर शुक्रवारी युरोपियन जिमनॅस्टिक फेडरेशनच्या सदस्यांनी मतदान केले. पण त्यांनी या सूचनेविरुद्ध मतदान केल्याचे सांगण्यात आले. 1 जानेवारी 2024 पासून होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बेलारुस आणि रशियाच्या अॅथलिट्सना पुनरागमनासाठी कडवा विरोध करण्यात आला आहे. पुढील वर्षी युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा रशियाच्या जिमनॅस्टना पात्रतेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची ठरणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article