सावंतवाडी तालुक्यात परप्रांतीय डंपर मालकांना विरोध
डंपर चालक मालक संघटनेच्या बैठकीत निर्णय
ओटवणे | प्रतिनिधी
परप्रांतीय डंपर मालकांना सावंतवाडी तालुक्यात वाहतूक करण्यास तीव्र विरोध करण्याचा निर्णय सावंतवाडी तालुक्यातील डंपर चालक व मालकांच्या बैठकीत घेण्यात आला. कारिवडे येथे झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील डंपर चालक- मालकांच्या या बैठकीत श्री देव उपरलकर डंपर चालक मालक संघटनेची स्थापना करण्यात आली. श्री देव उपरलकर डंपर चालक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी जीवन केसरकर सचिवपदी गोविंद शेटकर तर खजिनदारपदी प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेच्या उर्वरित कार्यकारणीची ही निवड करण्यात आली. या बैठकीला सावंतवाडी तालुक्यातील डंपर चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डंपर चालक मालकांच्या हिताच्या दृष्टीने विविध विषयावर चर्चा करण्यात आले. या बैठकीला गणपत घाडी, सचिन सापळे, मयूर कामत, राकेश सावंत, रोहीत साळगावकर, अभिषेक पावशे, आबाजी देसाई, अनंत सापळे, कौशिक केसरकर, रत्नाकर सापळे, अमेय आडेलकर, सचिन राऊळ, दशरथ शेळके, झहीर शेख, आनंद कुंभार, कलानिल आजगावकर, सत्यवान बंड, अनंत राऊळ, विनोद मल्हार, प्रदिप नार्वेकर, लक्ष्मण परब, उमेश भालेकर, आशिष कदम, हितेश म्हापसेकर, दानीश बेग, आशिष यादव, विशाल सावंत, बाबू डामरेकर, बबन डिसोजा, सागर देसाई, मिलिंद गोम्स, राजेश देसाई, शिवनाथ कोरगावकर, पांडूरंग खोटलेकर, हनुमंत राणे, शुभम केदार, दामोदर आकेरकर, ज्ञानेश्वर परब, मायकल डिसोजा, अनंतराव देसाई, सचिन शिरवणकर आदी सावंतवाडी तालुक्यातील डंपर चालक-मालक उपस्थित होते.