अरुणाचलमध्ये जलविद्युत प्रकल्पाला विरोध
06:48 AM Oct 07, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
ईटानगर
Advertisement
अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सियांग जिल्ह्यात 12,500 मेगावॅटच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात लोकांनी निदर्शने केली आहेत. गेकू गावात सियांग इंटीजीनस फार्मर्स फोरमकडून आयोजित निदर्शनांमध्ये शेकडो ग्रामस्थांनी भाग घेत एनएचपीसी आणि मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. हा प्रकल्प आमची भूमी, पर्यावरण आणि जीवनशैलीसाठी धोक्याचा असल्याचा दावा फोरमचे महासचिव डोंगो लिबांग यांनी केला आहे. एनएचपीसीने धरणाच्या निर्मितीसाठी अप्पर सियांग आणि सियांग जिल्ह्यांमध्ये तीन जागांचा प्रस्ताव दिला आहे. यातील एक जागा डिट्टे डिमे आणि गेकूदरम्यान आहे.
Advertisement
Advertisement
Next Article