For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमर खालिद, शरजील यांच्या जामिनाला विरोध

07:00 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
उमर खालिद  शरजील यांच्या जामिनाला विरोध
Advertisement

दिल्ली पोलिसांची न्यायालयात कडक भूमिका

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

फेब्रुवारी 2020 च्या दिल्ली दंगलीशी संबंधित कट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन अर्जांना विरोध केला आहे. पोलिसांनी या दोघांनाही दंगलीचे सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी त्यांचे नवीन जामीन अर्ज बेकायदेशीर आणि न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. दोघांचेही जामीन अर्ज खोट्या कारणांवर दाखल केले गेले आहेत आणि ते कायदेशीररित्या टिकू शकत नाहीत. 5 जानेवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाने या दोघांचा जामीन नाकारताना, इतर सह-आरोपींपेक्षा वेगळे असे त्यांचे नेतृत्व असल्याचे मान्य केले. 2020 च्या ईशान्य दिल्ली दंगलीशी संबंधित मोठ्या कट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन अर्जांना तीव्र विरोध केला आहे. दोन्ही आरोपी त्यांच्या स्वत:च्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देऊन, एका वेगळ्या प्रकरणातील निर्णयाचा जामिनासाठी नवीन आधार म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे मत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.