For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार मारहाणप्रकरणी विरोधकांनी एकत्र यावे

06:35 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आमदार मारहाणप्रकरणी विरोधकांनी एकत्र यावे
Advertisement

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे आवाहन

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

एक लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार असलेल्या व्यक्तीस जर अशी अमानवी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल उपस्थित करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आमदार विरेश बोरकर यांना पोलिसांकडून देण्यात आलेली हीन वागणूक व कथित मारहाण या प्रश्नी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

आमदार बोरकर यांच्या बाबतीत घडलेली सदर घटना ही अत्यंत गंभीर आणि अस्वीकार्ह्य असून या प्रकारास गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच जबाबदार असल्याचा आरोप आलेमाव यांनी केला आहे. अन्यथा त्यांच्या माहितीशिवाय पोलिस अशी कारवाई कशी करू शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एका लोकप्रतिनिधीच्या बाबतीत झालेल्या गैरवर्तन कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही, असेही आलेमाव यांनी म्हटले आहे.

श्री. बोरकर हे विरोधी पक्षाचे आमदार असल्याने त्यांना अशी वागणूक देण्यात आली आहे. मात्र तीच व्यक्ती जर सरकारपक्षातील असती तर तिलाही अशीच वागणूक मिळाली असती का? आणि भाजपने तिचे समर्थन केले असते का? असे सवाल आलेमाव यांनी उपस्थित केले आहेत.

Advertisement
Tags :

.