कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभा अधिवेशनात विरोधी आमदारांची कामगिरी उत्तम

12:40 PM Aug 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विरोधकांची 43 टक्के; तर सरकारकडून 53 टक्के सहभाग

Advertisement

पणजी : नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात शेवटच्या आठवड्यात सरकारची कामगिरी विरोधकांपेक्षा किंचित प्रभावी ठरली असली तरी संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी आमदारांची कामगिरी उत्तम राहिल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. कारण सरकारच्या बाजूने 33 आमदार होते. तर विरोधकांच्या बाजूने केवळ 7 आमदारांनी अधिवेशनाची धुरा सांभाळली. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) या पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनी विधानसभा अधिवेशनाच्या सत्रात गोमंतकीयांच्या काळजाला हात घालणारे प्रश्न उपस्थित केले.

Advertisement

गोवा नगरनियोजन खात्यावर त्यांनी प्रश्नांचा भडीमार करून प्रभावी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. गोवा विधानसभेच्या कामकाजामध्ये विरोधी पक्षाकडून एकूण 1 हजार 844 प्रश्न विचारले गेले. त्याची टक्केवारी 43 टक्के इतकी राहिली. सत्ताधाऱ्यांकडून 2 हजार 382 इतके म्हणजे 57 टक्के प्रश्न विचारण्यात आले. विरोधी पक्षातर्फे आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनी 272 प्रश्न उपस्थित केले. 7 लक्ष्यवेधी सूचना, शून्य तासात 15 मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर युरी आलेमाव विरोधी पक्षनेत्याची बाजू भक्कमपणे सांभाळताना दिसले. त्यांनी 270 प्रश्न, तर 7 लक्ष्यवेधी सूचना, आणि शून्य तासात 15 मुद्दे उपस्थित केले.

इतर विरोधी आमदारांची कामगिरी 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article