For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रीनलंडमधील राजकीय पक्षांचा विरोध

06:33 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्रीनलंडमधील राजकीय पक्षांचा विरोध
Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

Advertisement

ग्रीनलंड या उत्तर ध्रूवानजीकच्या आणि सध्या डेन्मार्कच्या अधिपत्यात असणाऱ्या देशाला आपल्या अधिपत्यात घेण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे. मात्र, अमेरिकेच्या अधिपत्याला आमचा विरोध आहे, असे वक्तव्य ग्रीनलंडमधील सर्व पाच राजकीय पक्षांनी केले आहे. आमच्या देशाचे भवितव्य निर्धारित करण्याचा अधिकार केवळ आमच्या देशातील नागरीकांना आहे. तो अधिकार जगातील दुसरा कोणताही देश हिसकावून घेऊ शकत नाही. आम्ही अमेरिकेचे नागरीक म्हणून राहणार नाही. आमच्या देशाचे स्वातंत्र्य आम्हाला राखायचे आहे, असे या राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. या देशाच्या इतिहासात प्रथमच तेथील सर्व राजकीय पक्ष अशा प्रकारे एकत्र आल्याचे दिसून येत आहे. तथापि, अमेरिकेने पुन्हा एकदा हे बेट ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केला असून तशी सज्जताही चालविली आहे.

ग्रीनलंडवर आम्ही नियंत्रण मिळविले नाही, तर ते बेट चीन आणि रशिया ताब्यात घेतील. त्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. उत्तर ध्रूवीय प्रदेशातील हे सामरिकदृष्ट्या महत्वाचे बेट आहे. अमेरिका या बेटाचा चहुमुखी विकास घडविणार आहे. अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे बेट आमच्या अधिपत्यात असणे आवश्यक आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केले आहे. त्यामुळे अमेरिका व्हेनेझुएलानंतर आता ग्रीनलंडवर हल्ला करणार का, असा प्रश्न आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विचारला जात आहे. डेन्मार्कने हा देश अमेरिकेच्या अधिपत्यात जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली असली, तरी तो देश अमेरिकेचे आव्हान कसे परतवणार, असाही मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.