विरोधकांना कोल्हापूरचा विकास करायचा न्हवता-आमदार महाडिक
आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते रिंगरोडच्या कामाचे उद्घाटन
कोल्हापूर
महायुतीच्या यशानंतर कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक लगेचच विकास कामाला लागले. शहरातील रिंगरोडच्या विकास कामाचे उद्घाटन झाले. तीन कोटी सेहेचाळीस लाखांचा निधी या रस्त्याच्या विकास कामासाठी मंजूर झाला आहे.
यावेळी आमदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर उपनगराचा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जाणारा रिंग रोड याच्या कामासाठी तीन कोटी सेहेचाळीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यातून काय रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत आहे. या कामाच्या निधी मंजुरीसाठी लोकसभा निवडणुकीपासून आणि पावसाळ्यापासून आम्ही प्रयत्नात होतो. पण आचारसंहितेच्या आधीच टेंडर प्रोसेस वगैरे सर्व काम झाली होती. तर कालच त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. म्हणून आज या कामाचा शुभारंभ होत आहे.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व दहा आमदार मिळुन कोल्हापूर शहराचा जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस राखत आहे. आम्हाला निवडुन दिल्याबद्दल आम्ही कोल्हापूरच्या सर्व जनतेचे आभारी आहे. यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेवर विरोधकांची सत्ता होती. विरोधकांना कोल्हापूरना कोल्हापूरचा विकास करायचा न्हवता. त्यामुळे येणाऱ्या काळात महानगरपालिकेवरही तुम्ही भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांना निवडुन द्यावे. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहेच. त्यामुळे आम्ही कोल्हापूरचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहु.