For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या राज्यातील ‘स्मार्ट मीटर’ ला विरोध करा!

03:26 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसच्या राज्यातील ‘स्मार्ट मीटर’ ला विरोध करा
Advertisement

वीजमंत्री सुदिन ढवळीकरांचा काँग्रेसवर निशाणा

Advertisement

फोंडा : गोव्यात ‘वीज स्मार्ट मीटर’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी आधी काँग्रेसशासीत राज्यातील स्मार्ट मीटरचे काम बंद करावे आणि मगच गोव्यात विरोध करावा. उगाच कुठल्याही गोष्टीवर जनतेची दिशाभूल कऊ नये, अशी टीका वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. काँग्रसने स्मार्ट मीटरविरोधी जे आंदोलन सुऊ केले आहे, त्याला उद्देशून मंत्री ढवळीकरांनी काल सोमवारी प्रसार माध्यमांसमोर ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वीज स्मार्ट मीटर हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून देशभरात विविध राज्यांमध्ये हे मीटर बसवले जात आहेत. उगाच विरोधासाठी विरोध कऊन स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला खो घालण्याचा प्रयत्न कऊ नये.

घेरावापेक्षा स्मार्ट मीटरवर चर्चा करावी

Advertisement

कॉँग्रेसवाल्यांनी अभियंत्यांना घेराव घालण्यापेक्षा स्मार्ट मीटरवर चर्चा करावी आणि आपल्या शंकांचे निरसन कऊन घ्यावे. गरज भासल्यास आपणही मदत करण्यास तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. देशभरात स्मार्ट मीटर बसवण्याचा हा त्यातीलच एक उपक्रम असून विकासकामांना सहकार्य करा, आडकाठी आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

मगो-भाजपाची युती कायम

दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मगो पक्षाची युती कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहमतीने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने ही युती झाली आहे. राज्यातील भाजपा नेते या युतीला अनुकूल असून निवडणुकीत जागा वाटपासंबंधी चर्चा पुढे होणार आहे, असेही मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

आरजीपीला गोव्याचे हित, विकासाशी देणेघेणे नाही

आरजी हा मुळात राजकीय पक्ष नसून मगो पक्षाला विरोध करण्यासाठी एकत्रित आलेले हे लोक आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत मडकई मतदारसंघातील आपली मते कशी कमी होतील, प्रियोळात दीपक ढवळीकर आणि फोंड्यात केतन भाटीकर यांचा पराभव कसा होईल, याकडे या लोकांनी लक्ष केंद्रीत केले होते. केवळ आरोप आणि टीका करणाऱ्या या लोकांना गोमंतकीय जनतेचे हित आणि विकासाशी काहीच देणेघेणे नाही. बांदोड्यातील मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामाला याच आरजीवाल्यांनी काही लोकांना हाताशी धऊन खो घालण्याचा प्रयत्न केला होता. लोकहिताशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.

Advertisement
Tags :

.