ओप्पोचा के 14 फोन बाजारात दाखल
7000 एमएएच बॅटरीसह 50 एमपी कॅमेऱ्याची सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओप्पोने भारतात आपला नवीन के-fिसरीज स्मार्टफोन ओप्पो के 14 5 जी सादर केला आहे. या फोनमध्ये 7000 एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी राहणार आहे. कंपनीने हा फोन तीन रंगाच्या पर्यायांमध्ये आणि तीन स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये सादर केला आहे. यांची सुरवातीची किंमत ही 17,999 रुपये इतकी राहणार असल्याची कंपनीची माहिती आहे.
डिस्प्ले आणि प्रोसेसर तपशील: या फोनमध्ये 6.75-इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले आहे, जो 120 एचझेड रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे. यामध्ये 1125 एनआयटीएसची कमाल ब्राइटनेस आहे, ज्यामुळे सूर्यप्रकाशातही क्रीन स्पष्टपणे दिसते. परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेन्शन 6300 चिपसेटचा वापर केला आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित कंपनीच्या नवीनतम कलर्स 15 वर चालतो. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी ट्रिपल रेटिंग. ओप्पो कंपनीने या फोनच्या टिकाऊपणावर खूप काम केले आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन आता आयपी 66, आयपी 68 आणि आयपी 69 रेटिंगसह आहे.