For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओप्पोचा फाईंड एक्स 9 अल्ट्रा 21 एप्रिलला होणार लाँच

06:38 AM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओप्पोचा फाईंड एक्स 9 अल्ट्रा 21 एप्रिलला होणार लाँच
Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

चिनी मोबाईल कंपनी ओप्पो यांचा नवा फाईंड एक्स 9 अल्ट्रा हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. भारतासोबत जागतिक स्तरावर 21 एप्रिलला सदरचा फोन लॉन्च केला जाणार आहे, अशी माहिती आहे. यात महत्त्वाचे म्हणजे फाईंड एक्स 9 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा दमदार मुख्य कॅमेरा देण्यात येणार आहे.

यासोबतच 200 मेगापिक्सलचा सुपर पोट्रेट टेलीफोटो कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा अल्ट्राव्हाइड कॅमेराही देण्यात येणार आहे. सेल्फीसाठी यामध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन 6.78 इंचाच्या ओएलइडी डिस्प्लेसोबत येणार असून फिंगरप्रिंट स्कॅनर या वैशिष्ट्यासह येणार आहे.

Advertisement

इतर वैशिष्ट्यो पाहुया

कलर ओएस 16 अँड्रॉइड 16 वरती हा स्मार्टफोन चालणार आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 इलाईट जन 5 प्रोसेसर दिला जाणार असून 7050 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. 50 डब्ल्यूचा वायरलेस चार्जर व 100 डब्ल्यूचा वायर चार्जर देण्यात येणार आहे. 12 जीबी, 16 जीबी रॅम तसेच 256 जीबी, 512 जीबी, 1 टीबी आशा स्टोरेजसह स्मार्टफोन येणार आहे.

Advertisement
Tags :

.