महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘परीक्षा पे चर्चा’ राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी

06:15 PM Dec 23, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभागी व्हावे : शिक्षणाधिकारी आंबोकर यांचे आवाहन

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या सोबतचा संवादात्मक परीक्षा पे चर्चा या अनोख्या कार्यक्रमाची सातवी आवृत्ती तालकटोरा स्टेडियम ,नवी दिल्ली येथे फेब्रुवारी, मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी व निवड करण्यासाठी 12 डिसेंबर 2023 पासून httpsë//innovateindia.mygov.in/ppcö2024 ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नांच्या द्वारे इयत्ता सहावी ते बारावी मध्ये शिकणारे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याकरिता स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने 12 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 पर्यंत खुली राहणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना संचालक, एन सी आर टी यांचे मार्फत सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व माध्यमाच्या इयत्ता सहावी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी ,पालक व शिक्षक यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा व मुख्याध्यापकांनी या उपक्रमास आपल्या शाळेच्या संकेतस्थळावरून तसेच पालकांच्या व्हाट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#kolhapurZPchaipecharchanationalinitiative
Next Article