For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेएसएफबीसह अन्य आयपीओंमध्ये गुंतवणुकीची संधी

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
जेएसएफबीसह अन्य आयपीओंमध्ये गुंतवणुकीची संधी
Advertisement

14 पासून होणार  बाजारात सुचीबद्ध :  जेएसएफबी, राशी पेरिफेरल्स लिमिटेड, कॅपिटल स्मॉल यांचा आयपीओ खुला

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

जनस्मॉल फायनान्स बँक (जेएसएफबी), राशी पेरिफेरल्स लिमिटेड आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यांचे आयपीओ आले आहेत. किरकोळ गुंतवणूकदार या तीन आयपीओमध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत बोली लावू शकतात. तिन्ही कंपन्यांचे शेअर्स 14 फेब्रुवारी रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध होणार असल्याची माहिती आहे. जनस्मॉल फायनान्स बँक या आयपीओची प्राइस बँड 393-414 प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. कंपनीला या इश्यूद्वारे 570 कोटी उभे करायचे आहेत. किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओमध्ये किमान 14,904 ची गुंतवणूक करू शकतात, यासाठी किमान 1 लॉटसाठी अर्ज करावा लागेल. राशी पेरिफेरल्स लिमिटेड आयपीओची प्राइस बँड 295-311 प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. कंपनीला या इश्यूद्वारे 600 कोटी उभे करायचे आहेत. किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओमध्ये किमान 14,928 ची गुंतवणूक करू शकतात. यासाठी, किमान 1 लॉटसाठी अर्ज करावा लागेल म्हणजे.  311 च्या वरच्या प्राइस बँडनुसार 48 शेअर्सवर बोली लावता येणार आहे.  कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक या आयपीओची 445-468 प्रति शेअर किंमत ठेवण्यात आली आहे. कंपनीला या इश्यूद्वारे 523.07 कोटी उभे करायचे आहेत. किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओमध्ये किमान 14,976 ची गुंतवणूक करू शकतात, यासाठी किमान 1 लॉटसाठी अर्ज करावा लागेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.