देशातील नवोदित महिला टेनिसपटूंना संधी
वृत्तसंस्था/ पुणे
बिली जिन किंग चषक महिलांची 2025 सालातील होणाऱ्या टेनिस स्पर्धेमुळे भारतीय नवोदित महिला टेनिसपटूंना त्यांच दर्जा सुधारण्यासाठी चांगलीच उपयोगी ठरेल, असे देशातील अव्वल टेनिसपटूंनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. बिली जिन किंग चषक 2025 ची आशिया-ओसेनिया गट 1 मधील सामने पुण्यामध्ये खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे, वैदेही चौधरी, श्रीवल्ली, सहेजा यमालपल्ली भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या स्पर्धेमध्ये चीन तैपेई, हाँगकाँग चायना, कोरिया प्रजासत्ताक, न्यूझीलंड आणि थायलंड आणि यजमान भारत यांचा समावेश राहिल. आशिया ओसेनिया गट 1 मधील या स्पर्धेचा हा टप्पा पुण्यामध्ये होणार आहे. सदर स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्पे भारतात भरविण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते आणि त्याला यशही मिळाले. ही स्पर्धा भारताच्या नवोदित महिला टेनिसपटूंना आपला दर्जा सुधारण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल, असे अंकिता रैनाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.