महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

06:21 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहारावरून भाजप, निजदचा सरकारवर हल्लाबोल

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महर्षि वाल्मिकी विकास निगमधील गैरव्यवहार प्रकरणावरून विधानसभेत चर्चेला सुरुवात करण्यात आली आहे तर विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडून चर्चेला मुभा देण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे वाल्मिकी विकास निगममधील निधीचे बेकायदा हस्तांतरण आणि म्हैसूर नगरविकास प्राधिकरणातील गैरव्यवहार प्रकरणावरून सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र, दोन्ही सभागृहांमध्ये नियम 69 अंतर्गत या प्रकरणावरील चर्चा हाती घेण्यात आली आहे. सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच अलीकडे निधन झालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारी भोजन विरामानंतर विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. यावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी लक्षवेधी सूचना मांडून वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणासंबंधी चर्चेला मुभा देण्याची विनंती सभाध्यक्षांकडे केली. त्यावर सभाध्यक्षांनी सध्या प्रश्नोत्तर कामकाज सुरू करूया. त्यानंतर चर्चेला मुभा देण्यात येईल, असे सांगितले.

परंतु, भाजपच्या आमदारांनी प्रश्नोत्तर चर्चा बाजूला ठेवून वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहारावर चर्चेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मात्र, त्यावर संमती न देता सभाध्यक्षांनी प्रश्नोत्तर चर्चेला सुरुवात केली. प्रश्नोत्तर तासानंतर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी नियम 69 अंतर्गत वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. मंगळवारी देखील यावर विस्तृत चर्चा होणार आहे. नंतर सरकार त्यावर उत्तर देईल.

विधानपरिषदेचे कामकाज 10 मिनिटे तहकूब

विधानपरिषदेत वाल्मिकी विकास निगमच्या गैरव्यवहार प्रकरणावरून गदारोळ झाला. शोकप्रस्तावानंतर लक्षवेधी सूचना मांडून भाजप आणि निजदने चर्चेला मुभा देण्याची मागणी केली. तेव्हा सभापती बसवराज होरट्टी यांनी प्रश्नोत्तर तासानंतर परवानगी देण्यात येईल, असे सांगितले. मात्र, भाजपच्या सदस्यांनी सुरुवातीला नकार दिला. नंतर सभापतींनी त्यांची समजूत काढल्यानंतर भाजप, निजदचे सदस्य प्रश्नोत्तर चर्चेत सहभागी झाले. प्रश्नोत्तर चर्चा झाल्यानंतर भाजप आणि निजदच्या सदस्यांनी लक्षवेधी सूचनेंतर्गत चर्चेला अनुमती देण्याची मागणी करून सभापतींच्या आसनासमोर धरणे आंदोलन सुरू केले. त्यामुळे सभागृहात गोंधळ माजल्याने सभापतींनी कामकाज 10 मिनिटे पुढे ढकलले.

...अन् विरोधकांनी आंदोलन घेतले मागे

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधकांनी धरणे आंदोलन सुरू केले. तेव्हा सभापती होरट्टींनी लक्षवेधी सूचनेंतर्गत चर्चा नको, दुसऱ्या स्वरुपात चर्चेला मुभा देईन, आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. त्यानंतर भाजप, निजद सदस्यांनी आंदोलन मागे घेतले. नंतर भाजपचे सदस्य सी. टी. रवी यांनी वाल्मिकी विकास निगममधील चर्चेला सुरुवात केली. निगममध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे, असा उल्लेख केला. यावेळी भाजपचे एन. रवीकुमार यांनी मध्येच हस्तक्षेप करत वाल्मिकी निगममधून बळ्ळारी लोकसभा निवडणुकीसाठी किती पैसा गेला. याविषयी चर्चा झाली पाहिजे, असा आग्रह धरला. यावेळी काँग्रेसचे यु. बी. वेंकटेश यांनी तुमच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराबद्दल आमच्या जवळ पुरावे आहेत. सभापतींनी प्रश्नोत्तर चर्चा हाती घेणार असल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा चर्चेची मागणी करण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न केला. त्यामुळे भाजप सदस्य आक्रमक झाले. काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिल्याने सभागृहात गदारोळ माजला.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article