ओप्पो रेनो 16 स्मार्टफोनची आवृत्ती सादर
50 -मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेऱ्याची सुविधा : सुरुवातीची किंमत 46,999 रुपये
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ओप्पो कंपनीने भारतात आपली नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यामध्ये कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16सी सादर केले आहेत. हे दोन्ही मोबाईल स्टायलिश लूक, 50 मेगापिक्सल टेलीफोटो आणि 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेल्फी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसरसह प्रीमियम मिड-रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. ओप्पो रेनो 16 सी तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 46,999 आहे. त्याच वेळी, ओप्पो रेनो 16 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याची किंमत 61,999 पासून सुरू होते. याशिवाय, कंपनीने ओप्पो एनसीओ एअर 5 बड्स देखील सादर केले आहेत. या स्मार्टफोनची विक्री 9 जुलै 2026 पासून सुरू होईल. लाँच ऑफर्समध्ये बँक कार्डवर 10 टक्केपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक, एक्सचेंज बोनस, 180 दिवसांचे क्रीन डॅमेज प्रोटेक्शन आणि ओप्पो एनसीओ बड्स 3 प्रो प्लसवर 50 टक्केपर्यंत सूट यांचा समावेश आहे.
डिझाइन : भारतातील पहिले बार होलोव्हर्स 3 डी डिझाइन ओप्पो रेनो 16 मधील दोन्ही स्मार्टफोन्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे त्याचे नवीन होलोव्हर्स 3 डी डिझाइन. जे कंपनीने भारतात पहिल्यांदाच आणले आहे. स्टारी व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेले हे डिझाइन, वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यास 3 डी इफेक्ट देते, ज्यामुळे फोन प्रीमियम दिसतो.