ओप्पो के 14 एक्स स्मार्टफोन भारतात सादर
06:20 AM Feb 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सुरुवातीची किंमत 14,999 रुपये : 120 एचझेड रिफ्रेश रेट डिस्प्लेसह
Advertisement
नवी दिल्ली :
दिग्गज टेक कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात आपला नवीन बजेट 5जी स्मार्टफोन ओप्पो के 14एक्स लाँच केला आहे. कंपनीने 50 एमपी कॅमेरा आणि 120एचझेड रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेसह फोन लाँच केला आहे. पॉवर बॅकअपसाठी यात 6500 एमएएच क्षमतेची बॅटरीची सुविधा दिली आहे. भारतात दोन प्रकारांमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे.
Advertisement
डिस्प्ले: ओप्पो के 14एक्स फोन 1570 ते 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.75-इंचाच्या एचडीप्लस डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे. हा पंच-होल स्टाइल केलेल्या क्रीन एलसीडी पॅनेलवर बनवला आहे जो 120 एचझेड रिफ्रेश रेट, 256पीपीआय आणि 1125 निट्स पीक ब्राइटनेस आउटपुट देतो.
Advertisement