ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्स लाँच होणार
मुंबई : ओप्पो ही स्मार्ट फोन कंपनी फाइंड एक्स 10 सिरीज अंतर्गत दोन स्मार्ट फोन भारतीय बाजारामध्ये लवकरच उतरविले जाणार आहेत. यामध्ये फाइंड एक्स 10 प्रो मॅक्स व फाइंड एक्स 10 यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच कंपनी 200 मेगा पिक्सलचा दमदार कॅमेरा स्मार्टफोन सोबत देणार असल्याचे समजते.
या स्मार्ट फोनमध्ये दोन रियल कॅमेरे 200 मेगापिक्सलचे दिले जाणार आहेत. या स्मार्टफोनला मीडीयाटेक डायमनसिटी नऊ हजार सिरीजचा प्रोसेसर दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजुला तीन 200 मेगापिक्सलचे कॅमेरे मिळतील. कॅमेऱ्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनचे सहकार्य मिळणार आहे. फोनमध्ये समोरच्या बाजुला सेल्फी आणि व्हिडीओकॉलसाठी 50 मेगा पिक्सलचा अल्ट्राक्लिअर कॅमेरा दिला जाणार आहे. भारतामध्ये हा स्मार्ट फोन 22 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार असल्याची माहिती कंपनीकडून मिळते आहे.
