For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ओप्पो फाइंड एक्स 10 आवृत्ती लाँच

06:48 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओप्पो फाइंड एक्स 10 आवृत्ती लाँच
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

ओप्पो इंडियाने प्रीमियम स्मार्टफोन श्रेणीमध्ये नवीन फाइंड एक्स10 आवृत्ती सादर केली आहे. यामध्ये ओप्पो फाइंड एक्स10 आणि फाइंड एक्स10 प्रो मॅक्स या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. या आवृत्तीची सुरुवातीची किंमत 1,39,999 रुपये आहे.

हॅसलब्लॅडच्या सहकार्याने ट्रिपल 200-मेगापिक्सेल कॅमेरा फाइंड एक्स10 मध्ये ड्युअल 200-मेगापिक्सेल कॅमेरा सिस्टीम आहे, तर प्रो मॅक्समध्ये मागील बाजूस तीन 200-मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, यामुळे फोटोंमध्ये रंग, बारीक तपशील आणि प्रकाशातील फरक अधिक स्पष्टपणे टिपता येतात. 4के आणि 8के सोबत व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी डॉल्बी व्हिजनची सुविधादेखील देण्यात आली आहे.

Advertisement

दोन्ही मॉडेल्समध्ये 8,000 एमएएच पर्यंतची बॅटरी असून 80-वॉट वायर्ड आणि 50-वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे. प्रो मॅक्समध्ये दोन नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो प्रोसेसर आहे.

टॅबलेट आणि इअरबड्स सादर

कंपनीने 8.8-इंचाचा ओप्पो पॅड मिनी टॅब्लेट, डायनऑडिओच्या सहकार्याने विकसित केलेले एन्को एक्स4 इअरबड्स आणि 10,000 एमएएच क्षमतेची पॉवर बँकदेखील सादर केली आहे.

Advertisement
Tags :

.