‘ओप्पो इ33’ आवृत्ती बाजारात दाखल
सुरुवातीची किंमत 31,999 पासून सुरु : स्मार्टफोन अत्याधुनिक सुविधांयुक्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
टेक कंपनी ओप्पोने 15 एप्रिल रोजी भारतीय बाजारात आपला नवीन 5 जी वर आधारीत स्मार्टफोन ‘ओप्पो इ33 लॉन्च केला आहे. यात ओप्पो इ33 आणि ओप्पो इ33 प्रो असे दोन मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे टिकाऊपणा आणि शक्तिशाली बॅटरी. याला आयपी69 के रेटिंग आहे, याचा अर्थ हा फोन केवळ पाणी आणि धूळ-प्रतिरोधकच नाही, तर 85ओ पर्यंतच्या गरम पाण्याच्या शॉवरमध्येही टिकू शकतो. तसेच, 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 80 फास्ट चार्जिंगसह 7000 बॅटरी देण्यात आली आहे. Bओप्पो इ33 तीन स्टोरेज पर्यायांसह आणि ओप्पो इ33 प्रो दोन स्टोरेज पर्यायांसह सादर करण्यात आला आहे. ओप्पो इ33 ची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये आहे आणि ओप्पो इ33 प्रो ची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये आहे. दोन्ही फोनचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे.
डिझाइन : 33 व्हिज्युअल इफेक्ट आणि प्रीमियम युनिबॉडी
ओप्पो इ33 प्रो ‘मिस्टी फॉरेस्ट“ थीमसह येतो, ज्यामध्ये पहिल्यांदाच डायनॅमिक डेप्थ 3 डी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
रंगांचे पर्याय : प्रो मॉडेल मिस्टी फॉरेस्ट, पॅशन रेड आणि स्टारी ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर, स्टँडर्ड मॉडेल आता पर्ल व्हाईट आणि फॉरेस्ट ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.