ओपीजी मोबिलिटी 400 कोटींचा निधी उभारणार
नवी दिल्ली :
इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) निर्माता ओपीजी मोबिलिटी (पूर्वी ओका ईव्ही) येणाऱ्या 18 ते 24 महिन्यांच्या कालावधीत जवळपास 400 कोटींचा निधी उभा करणार असल्याची योजना असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंशुल गुप्ता म्हणाले की, ‘कंपनीचा पोर्टफोलिओ आणि नेटवर्कचा विस्तार करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.
ओपीजी मोबिलिटीचे एमडी म्हणाले की, ‘कंपनी अलीकडेच री-ब्रँडिंग प्रक्रिया पार पाडली आहे. कंपनीचा मालकी व्यवसाय ‘फेराटो’ ब्रँड अंतर्गत सुरू आहे आणि या वर्षी कंपनी दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि एक इलेक्ट्रिक मोटरसायकल दोन आवृत्त्यांमध्ये लाँच करण्याची योजना आखत आहे. कंपनीचा तीनचाकी वाहन व्यवसाय ‘ओटीटीओपीजी’ ब्रँड अंतर्गत राहणार आहे. तसेच या वर्ष कंपनी विद्युत प्रवासी प्रवेश करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.