For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | हे 'ऑपरेशन टायगर' नाही, तर 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस'!" - उद्धव ठाकरेंचा थेट हल्लाबोल

05:33 PM Jun 28, 2026 IST | NEETA POTDAR
uddhav thackeray on devendra fadnavis   हे  ऑपरेशन टायगर  नाही  तर  ऑपरेशन देवेंद्र फडणवीस      उद्धव ठाकरेंचा थेट हल्लाबोल
Advertisement

मुंबई - गेले बऱ्याच दिवसांपासुन चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरवर अखेस शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे 'ऑपरेशन टायगर' नाही, हे 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे...

Advertisement

गेले बऱ्याच दिवसांपासुन ऑपरेशन टायगर चर्चेत होते... ऑपरेशन टायगर अंतर्गत महायुतीने ठाकरे गटातील सहा खासदारांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला ... यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले... होते यांनतर राज्याचे लक्ष लागुन राहीले होते ते शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रीयेकडे.. अखेर उद्धव ठाकरे ऑपरेशन टायगरवर मौन सोडत मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला..

काय म्हणाले उद्धव ठाकरे..?

Advertisement

उद्धव ठाकरे परभणीत एका कार्यक्रमात आले होते.. त्यावेळी ते म्हणाले ऑपरेशन टायगर' नाही, हे 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' आहे.जसं मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह (मामा) बदलून टाकला मामा. त्याचं नामोनिशाण ठेवलं नाही, फिर मामा को उल्लू बनाओ, मामा को बुला लिया ऊपर, डाल दिया कोने में, जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झाले आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी आज परभणीत केला. फुटीर खासदार बंडू जाधव यांच्याविरोधात झालेल्या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला. परभणीचा इतिहास शिवसेनेने ज्याला उमेदवार म्हणून उभे केले त्याला जनतेने नेहमी निवडून दिले. मागील वेळी खासदार निवडून आले ते मोदींच्या लाटेमुळे नव्हे, तर बाळासाहेबांच्या फोटोवर आणि मशालीवर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केले होते. गद्दारी करून भाजपच्या पायाशी लीन होणे हा महाराष्ट्र धर्माचा आणि मतदारांचा अपमान असल्याचा हल्लाबोल ठाकरे यांनी फुटीर बंडू जाधव यांच्यावर केला.

पुढे ते म्हणाले.. ठाकरे यांनी सांगितले की, ज्यांना परवडत नाही ना, ते गद्दारी करतात. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण जो या देशाला आपला मानतो, तो मुसलमान असला तरी आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे.आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याला शेतमालाला दाम, हे देणार आमचं हिंदुत्व आहे. तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायची, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं. आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आलीय, 'बाबर जनता पार्टी' ही बाबराची औलाद असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

Advertisement
Tags :

.