‘ऑपरेशन सिंदूरद्वारे क्रूर दहतवाद्यांचा खात्मा
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी अ•dयांना लक्ष्य केले होते. या कारवाईच्या माध्यमातून भारतीय सैन्याने 5 क्रूर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश मिळविल्याचे समोर आले आहे. मारले गेलेल्या दहशतवाद्यांची यादी समोर आली असून यात मसूद अझहरचा भाऊ आणि त्याच्या पत्नीचा भाऊ देखील सामील आहे. हा दहशतवादी आयसी-814 विमान अपहरण प्रकरणी वाँटेड होता. भारतीय संरक्षण मंत्रालयाने या मारले गेलेल्या दहशतवाद्यांची एक यादी जारी केली आहे. या दहशतवाद्यांचा संबंध प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आणि जैश-ए-मोहम्मदशी होता. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे मानले जात आहे.
मुदस्सर खादियन खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल
? लष्कर-ए-तोयबाचा हा दहशतवादी मुरीदकेमध्ये मरकज तैयबाचा प्रभारी होता.
? पाकिस्तानी सैन्याकडून सुपूर्द-ए-खाकदरम्यान मानवंदना देण्यात आली.
? पाकिस्तानी सैन्यप्रमुख अन् पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पुष्पांजली अर्पण केली.
? अंत्यसंस्कार दरम्यान नमाज एका शासकीय शाळेत पार पडली, याचे नेतृत्व जमात-उद-दावा (प्रतिबंधित जागतिक दहशतवादी)च्या हाफिज अब्दुल रौफने केले.
? पाकिस्तानी सैन्याचा लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलीस महासंचालक प्रार्थना कार्यक्रमात सामील झाले.
हाफिज मुहम्मद जमील
? जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा सर्वात मोठा मेहुणा.
? बहावलपूरमध्ये मरकज सुभान अल्लाहचा होता प्रभारी.
? युवांना कट्टरवादी करणे आणि जैश-ए-मोहम्मदसाठी निधी जमविण्यात सक्रीय स्वरुपात सामील.
मोहम्मद हसन खान
? जैश-ए-मोहम्मदचा हा दहशतवादी पीओकेतील ऑपरेशन कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरीचा होता पुत्र.
? जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये होती महत्त्वाची भूमिका.
खालिद उर्फ अबू अकाशा
? लष्कर-ए-तोयबाचा हा दहशतवादी काश्मीरमधील अनेक हल्ल्यांमध्ये सामील.
? अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांच्या तस्करीत होता सहभाग.
? फैसलाबादमध्ये अंत्यसंस्कार, वरिष्ठ पाकिस्तानी सैन्याधिकारी, फैसलाबादचे उपायुक्त अंत्ययात्रेत उपस्थित
मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब
? जैश-ए-मोहम्मदचा म्होरवया मसूद अझहरचा मेहुणा.
? जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये होता सामील.
? आयसी-814 विमान अपहरण प्रकरणी होता वाँटेड.