For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑपरेशन सिंदूर हेच नाव योग्य

07:00 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑपरेशन सिंदूर हेच नाव योग्य
Advertisement

अमेरिकेत शशी थरूर यांनी केले स्पष्ट : ऑपरेशनच्या नावावर मांडली भूमिका

Advertisement

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

अमेरिकेत भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ऑपरेशन सिंदूर हे निवडलेले नाव अत्यंत प्रभावी असल्याचे म्हणत याचे महत्त्वही समजाविले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवाद विरोधातील भारताची भूमिका मांडण्यासाठी सरकारच्या मोठ्या कूटनीतिक प्रयत्नांच्या अंतर्गत शिष्टमंडळ प्रमुख देशांचा दौरा करत आहे. अमेरिकेत नॅशनल प्रेस क्लबमध्ये एका संवाद सत्रादरम्यान थरूर यांनी भूमिका मांडली आहे. सिंदूरचा रंग रक्ताच्या रंगापेक्षा फारसा वेगळा नाही. ऑपरेशन सिंदूरचा अर्थ आमच्यासाठी ‘सिंदूरचा सूड रक्ताद्वारे’ असा होता. दहशतवाद्यांनी सिंदूरसोबत केलेल्या वर्तनाच्या प्रत्युत्तरादाखल त्यांचे रक्त सांडावे लागले असा याचा अर्थ असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.

Advertisement

भारताने दहशतवादविरोधी कारवाईसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का निवडले असा प्रश्न थरूर यांना विचारण्यात आला. ऑपरेशन सिंदूर प्रत्यक्षात निवडलेले एक प्रभावी नाव असल्याचे माझे मानणे आहे. सिंदूरबद्दल काही अमेरिकनांना माहिती नसावी, तर सिंदूर हे एक प्रतीक असून जे हिंदू परंपरेरत विवाहित महिला स्वत:च्या माथ्यावर लावत असतात. हे व्यापक स्वरुपात प्रचलित आहे. काही बिगरहिंदूही सिंदूरचा वापर करतात, परंतु त्यांच्याकडून प्रामुख्याने सजण्याच्या उद्देशांसाठी केला जातो. परंतु गांभीर्याने बोलायचे झाल्यास विवाह झाल्यावर दरदिनी विवाहित महिला सिंदूर लावत असतात. दहशतवाद्यांनी पुरुषांना त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोर ठार केले होते,

परंतु महिलांना त्यांनी जिवंत सोडले होते. एका पत्नीने मलाही मारून टाका असे सांगितल्यावर दहशतवाद्यांनी आम्ही  तुम्हाला मारणार नाही, तुम्ही परत जा आणि आम्ही काय केले हे सांगा असे सुनावले होते अशी माहिती थरूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 26 भारतीय महिलांच्या माथ्यावरील सिंदूर दहशतवाद्यांनी पुसले होते. याचमुळे आम्ही सर्वप्रथम सिंदूर पुसण्याच्या या घटनेचा सूड उगवू इच्छित होतो, तसेच सिंदूरचा रंग हा रक्ताच्या रंगापेक्षा फारसा वेगळा नसतो. अनेकार्थाने हिंदीत ‘खून का बदला खून’ अशी म्हण आहे. येथे ‘सिंदूर का बदला खून’ होईल. म्हणजेच सिंदूरसोबत जे काही दहशतवाद्यांनी केले, त्याच्या प्रत्युत्तरादाखल त्यांचे रक्त सांडावे लागले असे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.

अमेरिकेच्या खासदारांकडून समर्थन

शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमेरिकेच्या संसदेच्या विदेश विषयक समितीची भेट घेतली आहे. या बैठकीत अमेरिकेच्या खासदारांनी भारताचे जोरदार समर्थन केले आणि दहशतवाद विरोधी लढाईत देखील भारताच्या भूमिकेचे कौतुक केले. भारतीय शिष्टमंडणने अमेरिकेच्या विदेश विषयक समितीचे अध्यक्ष ब्रायन मास्ट, समितीचे सदस्य ग्रेगरी मीक्स, खासदार कमलागर डोव आणि बिल हुजएंगा यांची भेट घेतली. अमेरिकेच्या दोन्ही राजकीय पक्षांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा  करत भारताच्या कारवाईचे समर्थन पेले आहे.  जगात पहलगामसारख्या हल्ल्यांना कुठलेच स्थान नाही. जेव्हा तुमच्यावर हल्ला होतो, तेव्हा तुमच्याकडे या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्याशिवाय अन्य कुठलाच मार्ग नसतो. भारत आणि अमेरिकेचे संबंध अत्यंत चांगले असून भविष्यात दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये मोठी प्रगती आणि विस्ताराची शक्यता आहे. आम्हाला दहशतवाद विरोधात मिळून काम करावे लागणार आहे असे उद्गार ब्रायन मास्ट यांनी काढले आहेत.

भारताच्या प्रत्युत्तराचे समर्थन

अमेरिकेचे खासदार कमलागर डोव यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची निंदा केली आणि भारत-पाकिस्तान दरम्यानच्या संघर्षविरामाचे समर्थन केले. दहशतवाद कदापिही सहन केला जाऊ शकत नाही. दहशतवादी हल्ल्याच्या विरोधातील भारताच्या प्रत्युत्तराचे आम्ही समर्थन करतो असे डोव यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.