कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Operation Sindoor : 'तो' स्टेटस लावणाऱ्या तरुणाची धुलाई, रत्नागिरीकरांनी नेमकं काय केलं?

11:48 AM May 09, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

‘त्या’ तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार; पोलिसातही गुन्हा दाखल

Advertisement

रत्नागिरी : भारत सीमेपलिकडील दहशतवाद आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर' राबवत असताना रत्नागिरीत पाकिस्तानचे गुणगान गाणारा एक तरुण सोशल मिडीयाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांच्या समोर आला. स्टेटस्वर पाकिस्तान जिंदाबाद करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर निंदा करणाऱ्या त्या तरुणाला देशप्रेमी रत्नागिरीकरांनी चांगलाच चोप देत अद्दल घडवली.

Advertisement

जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महम्मद बद्रुद्दीन परकार ( २१, मूळ केजीएम प्लाझा, गोवळकोट- चिपळूण, सध्या रा. महादेवनगर, रत्नागिरी) असे त्या संशयित तरुणाचे नाव आहे.

रत्नागिरीकर देशप्रेमी तरुणांनी चोप दिल्यानंतर जखमी अवस्थेत त्या तरुणाला पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने दंगा काबू पथकाला पाचारण केले होते. दंगा काबू पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयाचा ताबा घेतला होता. शहर पोलीस निरीक्षक शिवरेकर यांच्यासह पोलीस पथकही या ठिकाणी दाखल झाले होते. शहर पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उघडपणे ‘पाकिस्तान जिंदाबाद... 

पाकिस्तानसाठी प्रार्थना करा.....असे स्टेटस् त्याच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपला लावले आणि व्हायरल केले होते. ही बाब सोशल मिडीयावर नजर ठेवून असलेल्या रत्नागिरीकरांच्या नजरेत पडली. यामुळे देशप्रेमी रत्नागिरीकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

'भारत माता की जय' घेतले वदवून 

त्या स्टेटस् ठेवलेल्या युवकाची माहिती घेण्यात आली. तो रत्नागिरीतील एका आस्थापनेत काम करत असल्याचे समोर आले. संतापलेल्या रत्नागिरीकर तरुणांनी ते शोरूम गाठले. पण त्या व्यवस्थापनाने युवकाला या स्टेटस्मुळे आदल्या दिवशीच कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यात आले. मात्र भारतात राहूनही दहशतवाद्यांवर प्रेम उतू जाणाऱ्या व पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या त्या युवकाला देशप्रेम शिकवण्याचा निश्चय रत्नागिरीकर तरुणांनी केला होता. रत्नागिरीकर देशप्रेमी तरुणांनी त्या तरुणाला गुरुवारी शोधून गाठलेच आणि आपल्या पद्धतीने यथेच्छ चोप देत भारत माता की जय.... म्हणायला लावले.

Advertisement
Tags :
#IndianNavyAction#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaIndia Pakisatan warKarachi PortOperation SindoorOperation Sindoor 2Ratngiri
Next Article