For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

7 ऑगस्टला झळकणार ‘ऑपरेशन सफेद सागर’

06:34 AM Jul 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
7 ऑगस्टला झळकणार ‘ऑपरेशन सफेद सागर’
Advertisement

सिद्धार्थ-जिमी शेरगिलची वेबसीरिज

Advertisement

नेटफ्लिक्सची आगामी वेबसीरिज ‘ऑपरेशन सफेद सागर’ 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ओनी सेनकडून दिग्दर्शित या सीरिजमध्sय सिद्धार्थ, जिमी शेरगिल, अभय वर्मा, दीया मिर्झा, प्राजक्ता कोळी, आदिल हुसैन, मिहिर आहूजा, तारुक रैना, अर्नव भसीन अन् अमृता बागची मुख्य भूमिकेत आहे.

या सीरिजचा टीझर जारी करण्यात आला आहे. 1999 च्या कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही सीरिज वायुदलाच्या गोल्डन एरो स्क्वाड्रनची कहाणी सांगणारी आहे. अधिक उंचीवरील हवाई अभियान पार पाडणाऱ्या या स्क्वाड्रनने युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याला पराभूत करण्यास भारतीय सैन्याला मोठी मदत केली होती.

Advertisement

टीझरमध्ये मिहिर आहूजा, अभय वर्मा आणि तारुक रैना यांना युवा वैमानिकाच्या रुपात सादर करण्यात आले आहे. तर त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाते, ज्यांची भूमिका सिद्धार्थ आणि जिमी शेरगिल यांनी साकारली आहे. ही सीरिज भारतीय वायुदलाच्या 1999 मधील मिशन ऑपरेशन सफेद सागरवर आधारित आहे. याची निर्मिती मॅचबॉक्स शॉट्स आणि फील गुड फिल्म्सकडून करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.