ऑपरेशन हेराल्ड ऑफ व्हिक्ट्री
कतारमधील अमेरिकेचा तळ इराणकडून लक्ष्य
अमेरिकेने आण्विक केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल इराणने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर जोरदार बॉम्बवर्षाव केला आहे. इराणने या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईला ‘ऑपरेशन हेराल्ड ऑफ व्हिक्ट्री’ नाव दिले. ऑपरेशन हेराल्ड ऑफ व्हिक्ट्री या नावाने इराणकडून सैन्यमोहीम राबविण्यात आली. याच्या अंतर्गत इराणने कतार येथील अमेरिकेचे सैन्यतळ विशेषकरून अल-उदैद वायुतळावर बॉम्बवर्षाव केला आहे.
इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड्स कॉर्प्सने (आयआरजीसी) ‘एएस’ कोडचा वापर करत अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशावर खतम अल-अनबिया सेंट्रल हेडक्वार्टरच्या (पीबीयूएच) देखरेखीत कतारमध्ये अल उदैद तळाला शक्तिशाली क्षेपणास्त्राला लक्ष्य केले. अल उदैदमध्ये अमेरिकेच्या सैन्यासाठी रणनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वाचा वायूतळ आहे.
प्रत्येक हल्ल्याचे प्रत्युत्तर मिळणार
व्हाइट हाउस आणि त्याच्या सहकाऱ्यांना क्षेत्रीय अखंडत्व, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आल्यास प्रत्येक आगळीकीला चोख प्र्र्रत्युत्तर दिले जाणार असा संदेश इराणच्या सैनिकांनी दिला आहे. अमेरिकेच्या आक्रमक आणि अशिष्ट कारवाईला हे थेट आणि शक्तिशाली प्रत्युत्तर आहे. आता हिट अँड रनचे युग समाप्त झाल्याचे आयआरजीसीने म्हटले आहे.