For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशपूर रोड येथील स्मार्ट रोड वाहतुकीसाठी खुला करा

11:08 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणेशपूर रोड येथील स्मार्ट रोड वाहतुकीसाठी खुला करा
Advertisement

कॅन्टोन्मेंट रहिवासी वेल्फेअर असोसिएशनची सीईओंकडे मागणी

Advertisement

बेळगाव : गणेशपूर रोड, लक्ष्मीटेकडी ते हिंडलगा रोड येथील गांधी पुतळा रस्त्याला जोडणारा स्मार्ट रोड मागील काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गणेशपूरहून हिंडलगा अथवा शहरामध्ये जाताना वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेंन्ट वेल्फेअर असोसिएशनतर्फे कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रामघाट रोडवर कॅन्टोन्मेंटच्या हद्दीच्या शेवटापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत स्मार्ट रोड म्हणून ओळखला जातो. गणेशपूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने वाहनांची संख्या वाढली आहे.

या परिसरात अनेक हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये असल्यामुळे स्मार्ट रोड सुरू झाल्यास ये-जा करणे सोयीचे होणार आहे. 3 जानेवारी 2026 रोजी या परिसरातील दोन वरिष्ठ सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी बिग्रेडियर जॉयदीप मुखर्जी यांची भेट घेऊन हा रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. रस्ता बंद करणे हे कायद्याच्याच विरोधात आहे. 2018 मध्ये कॅन्टोन्मेंटचे सीईओ दिव्या शिवराम यांनी हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला होता. मात्र तो आता पुन्हा बंद केल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा रस्ता खुला करण्याची मागणी सीईओंकडे केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.