Matka Gambling | जत शहरात खुलेआम मटका! पोलिसांचा छापा, माजी नगरसेवकासह दोघांवर गुन्हा
जत : शहरातील बिज्जरगी पेट्रोलपंपाच्या पाठीमागील बोळात बेकायदेशीर पद्धतीने मटका घेण्यावर जत पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. यामध्ये मटका बुक्की चालक माजी नगरसेवक राजू यादव याच्यासह दोघांवर जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी २९ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जत शहरातील बिज्जरगी पेट्रोलपंपाच्या पाठीमागील बोळात बेकायदेशीर पद्धतीने व खुलेआम पणे मटका घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय घेरहे यांना मिळाली.रोख रकमेसह मटक्याचे साहित्य जप्तयाठिकाणी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये बापुसो प्रभाकर शिंदे (वय ३७, रा. तिप्पेडाळळी) हा खुलेआम पणे मटका घेत असताना आढळून आला. कारवाईदरम्यान वेगवेगळे आकडे लिहिलेली कागदाची चिठ्ठी, निळ्या शाईचा पेन आणि रोख एक हजार ३०० रक्कम, असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी संशयित आरोपी शिंदे व मटका बुक्की चालक, माजी नगरसेवक राजू यादव याच्यावर जत पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम १८८७ मधील कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.