कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ओपन एआय’ने मस्कच्या स्पेसएक्सला मागे टाकले

06:31 AM Oct 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्पेसएक्सचे सध्याचे मूल्य 400 अब्ज डॉलर 

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

चॅटजीपीटी निर्माता ओपनएआय एलॉन मस्कच्या स्पेसएक्सला मागे टाकत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी बनली आहे. एका करारामुळे कंपनीचे मूल्य 500 अब्ज डॉलर (रु. 44.3 लाख कोटी) झाले आहे. या तुलनेत पाहता स्पेसएक्सचे मूल्य 400 अब्ज डॉलर आहे. त्याला ओपन एआयने मागे टाकले आहे. ओपनएआयच्या सध्याच्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी या मूल्यांकनात अंदाजे 6.6 अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स थ्राईव्ह कॅपिटल, सॉफ्टबँक ग्रुप, ड्रॅगोनियर इन्व्हेस्टमेंट ग्रुप, अबू धाबीचे एमजीएक्स आणि टी. रो प्राइस सारख्या गुंतवणूकदारांना विकले. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने सॉफ्टबँकच्या नेतृत्वाखाली निधी संकलन केला.

ओपनएआयच्या वाढत्या मूल्याची तीन कारणे:

जलद महसूल वाढ: 2025 च्या सुरुवातीला कंपनीचा वार्षिक महसूल दुप्पट होऊन 12 अब्ज डॉलर्स झाला. या वर्षाच्या अखेरीस कंपनीने 20 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य ठेवले आहे. मोठा वापरकर्ता आधार: चॅटजीपीटीमध्ये 2 अब्ज सक्रिय वापरकर्ते आहेत जे 5 डॉलर्स मासिक कमाई शुल्क भरतात. परिणामी, कंपनीला 120 अब्ज डॉलर्सच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे, जी गुगल आणि फेसबुकच्या जवळपास आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article