For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओपेक प्लस कपातीमुळे तेल पुरवठा बिघडणार नाही

06:53 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओपेक प्लस कपातीमुळे तेल पुरवठा बिघडणार नाही
Advertisement

तेलाच्या किमती कमी राहणार असल्याची व्यक्त केली अपेक्षा : पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची माहिती

Advertisement

नवी दिल्ली :

ओपेक प्लस देश सध्याला कच्च्या तेलाचे उत्पादन करत असल्याने भारताच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जागतिक औद्योगिक मागणी कमी राहिल्यास आणि रशियन कच्च्या तेलावरील सवलत कायम राहिल्यास भारताच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही.

Advertisement

मागील रविवारी ओपेक प्लस देशांनी ऐच्छिक उत्पादन कपातीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या समूहाने दररोज एकूण 58.6 लाख बॅरल किंवा जागतिक तेल मागणीच्या 5.7 टक्के उत्पादनात कपात करण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये 2025 च्या अखेरीपर्यंत मोठ्या उत्पादनात प्रतिदिन 36.6 लाख बॅरल्सच्या कपातीचा समावेश आहे. सध्या सौदी अरेबिया आणि रशियासह 8 देशांनी लागू केलेल्या 22 लाख बॅरल प्रतिदिन उत्पादनातील कपात देखील 3 महिन्यांसाठी वाढवली जाईल.

भारताच्या तेल पुरवठ्यात बदलाची शक्यता नाही

सध्याच्या उत्पादनातील कपात सुरू ठेवण्याची ताजी घोषणा असली तरी भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात बदल होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहतूक खर्च वाढल्यामुळे आणि जहाजे लुटण्याच्या जोखमीमुळे भारताला होणारा तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, ज्यामुळे तेलाच्या किमतीत तात्पुरते चढ-उतार होऊ शकतात. आम्ही लाल समुद्र आणि पर्शियन गल्फमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. 2022 पासून, भू-राजकीय जोखमींमध्ये वारंवार वाढ झाल्यामुळे या प्रदेशातील सागरी व्यापार मार्ग विस्कळीत झाले आहेत. आतापर्यंत भारताच्या आयातीवर फारसा परिणाम झालेला नाही. कच्च्या तेलाच्या जागतिक मागणीत घट झाल्यामुळे तेल उत्पादक देशांची चिंता वाढली आहे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

चीनमध्ये उत्पादन घटले

ओपेकने 2024 च्या शेवटच्या महिन्यात कच्च्या तेलाची मागणी वाढण्याबाबत परिस्थिती अनिश्चित आहे. चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये चीनचे कच्च्या तेलाचे उत्पादन 3.3 टक्क्यांनी घसरून 14.36 दशलक्ष बॅरल प्रतिदिन झाले, ऑगस्ट 2022 पासून वार्षिक आधारावर पहिली मासिक घट नोंदवली आहे. ओपेक प्लसने 2024 मध्ये जागतिक तेलाच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मार्चपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही आणि मागणी 2.2 दशलक्ष बॅरल प्रतिदिन राहिली आहे.

भारतीय कंपन्यांना सवलतीत तेल

भारतीय रिफायनर्सना रशियाकडून सवलतीत तेल मिळत राहण्याचे आश्वासन मिळाले आहे. सरकारी रिफायनरीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘रशियन तेलावरील सवलत 2023 च्या मध्यात बंद झाली होती, परंतु नंतरच्या महिन्यांत पुन्हा सवलत सुरू झाली. सध्याची परिस्थिती पाहता, सवलत अचानक मोठ्या प्रमाणात कमी होईल,’ असे कोणतेही संकेत नाहीत.

Advertisement
Tags :

.