For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नांचा खाणीत केवळ महिलांनाच नोकरी

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
रत्नांचा खाणीत केवळ महिलांनाच नोकरी
Advertisement

अत्यंत खास आहे कारण

Advertisement

खाणीत प्रामुख्याने पुरुष कार्यरत असतात, कारण खाणकाम हे तुलनेत अवघड मानले जाते. परंतु झिम्बाम्बेतील एका खाणीत केवळ महिलांनाच नोकरी दिली जाते. या खाणकामासाठी महिलांना उत्तम पगारही दिला जातो. या खाणीत पर्यावरणाला कमीतकमी नुकसान पोहोचेल असे प्रयत्न केले जातात.  केवळ महिलांनाच नोकरी देण्याचे कारण जाणून घेतल्यावर संयुक्त राष्ट्रसंघासमवेत अनेक देशांनी कौतुक केले आहे. उत्तर झिम्बाम्बेच्या दुनगुजा नदीच्या काठावर प्रामुख्याने खाणकाम होते. येथे झिम्बाकुआ यासारख्या अनेक कंपन्या रत्नांचा शोध घेत आहेत. अशाचप्रकारे कारोईमध्ये बहुतांश लोक गोल्ड मायनिंगचे काम करत आहेत. परंतु येथे केवळ महिलांनाच कामावर ठेवले जाते, महिलांकडूनच सर्व कामे केली जातात. ड्रिलिंग, हॅमरिंग आणि मोठमोठ्या दगडांची वाहतूक येथील महिलांचे दैनंदिन काम आहे. महिला येथे अॅक्वामरीनचा शोध घेताना दिसून येतात. या खाणीत वापरण्यात येणाऱ्या पद्धती कामगारांना कमीतकमी नुकसान पोहोचेल अशाप्रकारच्या आहेत.

फिरोजा रत्नांचे भंडार हे प्रामुख्याने पर्वतांच्या तळाशी आढळून येतात. तरीही विस्फोट करण्याऐवजी छेनी-हातोड्याद्वारेच रत्न मिळविले जाते. यामुळे पर्यावरणाला धक्का पोहोचत नाही. खाण प्रक्रियेत रसायनांचा वापर करण्यात येत नाही. तसेही कमीतकमी प्रमाणात पाणी वापरले जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार येथील महिलांना दर महिन्याला 180 युरो इतका पगार मिळतो. हा आकडा अन्य नोकऱ्यांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. या महिला खाणीच्या परिसरात भाज्यांचे पीक देखील घेतात. या भाज्या गरीब आणि वृद्ध लोकांमध्ये वाटल्या जातात. महिलांचे सशक्तीकरण व्हावे याकरता केवळ त्यांनाच काम केले जाते. या महिलांना अन्य कुणावर निर्भर रहावे लागू नये हा यामागचा उद्देश आहे. अनेक महिला या नोकरीमुळे स्वत:च्या मुलांची आणि बेरोजगार पतीची देखभाल करण्यास सक्षम आहेत, असे मायनिंग कंपन्यांचे सांगणे आहे. सर्वसाधारणपणे कंपन्या पुरुषांना प्राधान्य देतात, परंतु आम्ही वेगळे आहोत. आम्ही केवळ महिलांनाच संधी देण्याचा निर्णय घेतला. महिलांची क्षमता पुरुषांपेक्षा कमी नसल्याचे आम्हाला माहित आहे. सरकार महिलांना पुरुषप्रधान क्षेत्रांचे अध्ययन करण्यासाठी प्रोत्साहित करू शकते असे उद्गार झिम्बाकुआ मायनिंग कंपनीचे व्यवस्थापक रुंबिडजई ग्विनजी यांनी काढले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.