For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gold And Silver Update: सोने २२०० रुपये तर चांदी १३६०० ने महागली

02:31 PM Dec 01, 2025 IST | NEETA POTDAR
gold and silver update  सोने २२०० रुपये तर चांदी १३६०० ने महागली
Advertisement

                                           सोने व चांदीच्या दरात वाढ सुरूचं

Advertisement

कोल्हापूर : डिसेंबरमध्ये अवघे दोनच विवाह मुहूर्त असतानच, सोने व चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. गेल्या पाच दिवसामध्ये सोने १० ग्रॅममागे २४०० तर चांदी किलोमागे १३६०० रूपयांनी महागली आहे. तर अवघ्या एका दिवसात सोने २००० तर चांदी ८१०० रुपयांनी महाग झाली आहे.

चांदीने पावणे दोन लाखाचा टप्पा पार केला आहे. गुरुवारी सोने दर १२९५०० रूपये असा होता. तर रविवारी हाच दर १३१९०० असा झाल्याने, सोने २४०० रुपयांनी वधारले आहे. तर बुधवारी चांदी दर १,६३,८०० असा होता.

Advertisement

रविवारी हाच दर १,७७४०० रूपये असा झाला. शनिवारी सराफ बाजाराला आठवडी सुट्टी असते. शुक्रवारी सोने दर १२९९०० असा होता. तर चांदी १६९७०० रूपये असल्याने, ८१०० रूपयांनी चांदी दर बाढून १७७४०० रुपये झाली आहे.

Advertisement
Tags :

.