For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अॅपल स्टोअरमधून दोनच आयफोन खरेदी करता येणार

06:05 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅपल स्टोअरमधून दोनच  आयफोन खरेदी करता येणार
Advertisement

पुनर्विक्री आणि साठेबाजी रोखण्यासाठी मर्यादा आणण्याचा विचार

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आता सणासुदीच्या काळात दोनपेक्षा जास्त आयफोन खरेदी करू शकणार नाही, कारण अॅपलने एका ग्राहकाला अधिकृत ऑनलाइन स्टोअरमधून जास्तीत जास्त 2 आयफोन खरेदी करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. एका मॉडेलचे 2 आयफोन खरेदी करायचा असो किंवा दोन वेगवेगळे मॉडेल आणि कार्टमध्ये तिसरा आयफोन टाकताच, सिस्टम ऑर्डर थांबवणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

ऑफलाइन स्टोअरवर कोणतीही मर्यादा नाही

दोन आयफोन खरेदीची मर्यादा फक्त ऑनलाइन खरेदीसाठी आहे. तुम्हाला 2 पेक्षा जास्त फोन खरेदी करायचे असल्यास, तुम्ही ते थेट अॅपलच्या ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकता. आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्सची विक्री भारतासह जगभरात 18 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे या फोनला प्रचंड मागणी आहे.

काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न

सणासुदीच्या काळात, काही पुनर्विक्रेते एकाच वेळी डझनभर आयफोन खरेदी करत असत, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना फोन मिळत नसत. हा नियम साठेबाजी आणि काळाबाजार रोखेल आणि प्रत्येकाला फोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याकरीता कंपनीने हा बदल केला असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :

.