बिद्री गावाने गाव बंदी उठवली ! ऊस दरावर चर्चा करणार असेल तरच प्रवेश
बिद्री प्रतिनिधी
गेल्या वर्षीच्या ऊसाला चारशे रुपये आणि यावर्षीच्या ऊसाला 3500 पहिला हप्ता विना कपात देण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायत मध्ये देणाऱ्यांनाच गावात प्रवेश अन्यता एकाही राजकीय नेत्यांना आणि बिद्री साखर कारखान्याच्या उमेदवारांना गावात येऊ देणार नाही असा पवित्रा राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर ग्रामस्थांनी घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ग्रामस्थांनी हा निर्णय घेऊन गावची एक इतर दाखवलीच आहे याचबरोबर गावकरील ते राव काय करील हेही या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.
गेल्या दोन महिन्यापासून ऊस दराचे आंदोलन संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पसरले आहे त्यामुळे साखर कारखानदार स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघर्ष करत आहेत अशातच आता बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर ग्रामस्थांनी ऊस दरासाठी वेगळ्या पद्धतीचा आंदोलन सुरू केला आहे. मागील वर्षाच्या ऊसाला चारशे रुपये आणि या वर्षाच्या उसाला 35 रुपये एक रकमी दर जाहीर करून तसे ग्रामपंचायत मध्ये लेखी द्यावे आणि गावात प्रवेश करावा अन्यथा एकाही राजकीय नेत्यांना किंवा बिद्री साखर कारखान्याच्या उमेदवारांना गावात येऊ देणार नाही. असा एकमुखी निर्णय गावाला घेतला आहे याचबरोबर कोणी लेखी देऊन आमची फसवणूक केली तर असाच फलक त्याच्या गावाचा मुख्य चौकात लावणार असाही पवित्र येथील तरुणांनी घेतला आहे त्यामुळे आता राजकीय नेत्याची मोठी पंचायत झाली आहे राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावात अनेक सुज्ञान नागरिक आहेत अनेक चांगल्या गोष्टींना गाव पाठिंबा देत गावच्या विकासात हातभार लावणारे हे गाव आहे. ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाला ग्राम पंचायतीने ही पाठिंबा दिला आहे यामुळे आता लबाड लांडग्याची पंचायत झाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी हा उपेक्षितच राहिला आहे वास्तविक पाहता शेती करत असताना सध्याचा मिळणारा दर यातून खर्च सुद्धा निघत नाही असे असताना साखर कारखानदार ऊस दराचा तोडगा काढत नाहीत ही लाजिरवाणी बाब आहे,शेतकरी नाही घेतलं तर यांची चाललेली ही चंगळवाडी जीवन कशावर चालणार असाही संतप्त सवाल शेतकरी वर्गातून विसरला जात आहे यावेळी दत्तात्रेय मनुगडे, संजय गवते, कृष्णात पाटील व्यंकटेश चव्हाण कृष्णात बाबर शरद पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.