चुकीचे काम करणाऱ्यालाच संरक्षण लागते
सातारा :
मंत्रीपद आज आहे तर उद्या नाही. मंत्रीपद मिळाले म्हणून डोक्यात हवा जावू द्यायची नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. पोलिसांचे सरंक्षण कोणाला लागते. ज्यांच्याकडून चुकीची कामे होतात त्यांना. आपण कुठे काही चुकीचे काम केले नाही तर कशाला प्रोटेक्शन हवे. आपण सिग्नलला बघतो, एखादी सायरनची गाडी आली की आपल्याला किती त्रास होतो. त्यामुळे आपण स्वत:वरुन ओळखावे. भोंग्याचा त्रास किती होतो ते, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी टीप्पणी केली.
विलासपुर येथे हळदीकुंकू कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी विलासपुर भागातील सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, नगरसेवक शेखर मोरे पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले, मंत्रीपद आज आहे उद्या नाही. मंत्रीपद मिळाले म्हणून डोक्यात हवा जावू द्यायची नाही. असे माझे स्पष्ट मत आहे. पोलिसांचे प्रोटेक्शन कोणाला लागते. जे काही चुकीचे करत असतात त्यांना. आपण कुठे काही चुकीचे केलेच नाही. कोणाचे काही काढून घेतले नाही. कोणाचे काही लाटले नाही. कुठे काही आपण चोऱ्या माऱ्या किंवा तसा काही प्रकार केला नाही. त्यामुळे आपल्याला प्रोटेक्शन नको आहे. तरी मला प्रशासनाने दोन गाड्या दिल्या होत्या. त्या दोन्ही परत पाठवून दिल्या. मला जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला, मंत्रीसाहेब एक तरी गाडी राहू द्या. तेव्हा मी त्यांना म्हणलं ठिक आहे गाडी घेतो पण ती गाडी माझ्या गाडीच्या मागे राहिल. गाडीचा सायरन सुरु झाला की मला लोक म्हणतील, बाबा एकटे फिरत होते, आता भोंगा वाजवत फिरतात. म्हणून अजिबात पुढे गाडी राहणार नाही माझ्या गाडीच्या मागे गाडी राहिल. तिचा सायरन कुठे वाजणार नाही. तुम्ही म्हणता म्हणून गाडी ठेवतो. गाडीचा सायरन वाजवायचा नाही म्हणून पोलिसांना सूचना दिल्या आहेत. सायरन लावायचा नाही, लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. आपण सिग्नलला उभे असताना पाठीमागून भोंगा वाजला की आपल्याला वैताग येतो. तसेच आपल्यावरुन दुसऱ्याला त्रास होतो हे पाहून मी सायरन न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी भाषणात बोलताना सांगितले.
त्यांच्या वक्तव्याचा आधार घेत रोख मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे
शंभूराज देसाइं& हे त्यांच्या ताफ्यामधील वाहनांचे सायरन वाजवत फिरतात. त्यावरुन विरोधक टीका करतात हे सर्वश्रृत आहे. त्यातच विलासपूर येथील कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजे यांनी सायरन, भोंगा, पोलीस संरक्षण असे शब्द उच्चारले गेले. त्यांच्या याच वक्तव्याच्या अनुषंगाने मीडियाने मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाजुने रोख असल्याचा संशय व्यक्त केला आहे.