कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तरुणाईच विकसित भारत घडवेल

03:41 PM Dec 16, 2024 IST | Pooja Marathe
Only the youth will build a developed India.
Advertisement

एआयसीईटीचे उपाध्यक्ष अभय जेरे यांचे प्रतिपादन

Advertisement

कोल्हापूर
सर्वच क्षेत्रांमध्ये जगामध्ये होणारे बदल हे अत्यंत वेगवान पद्धतीने मार्गक्रमण करत आहेत. आपापल्या कौशल्या प्रमाणे लोक नोकरी वरती अवलंबून न राहता वेगवेगळ्या संस्थांमध्ये मर्यादित कालावधीच्या छोट्या मोठ्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून योगदान देत आहेत. ज्या वेगाने जग बदलत आहे, त्या वेगाने स्वत:च्या कौशल्यांचा विकास करून विकसित भारत तरूणाईच घडवू शकेल, असे प्रतिपादन एआयसीटीईचे उपाध्यक्ष अभय जेरे अभय जेरे यांनी केले.
केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-24 या स्पर्धेचा समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
जेरे म्हणाले, सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाला अवगत करत सृजनशील कल्पनेच्या माध्यमातून स्वत :ची प्रगती करून घेत आहेत. भविष्यातील आव्हानांचा विचार करून कमीत कमी वेळेमध्ये,कमी खर्चामध्ये प्रश्नांची उकल करणारा अभियंता ही काळाची गरज बनलेली आहे.
संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांना करून दिली. देशभरातील 14 राज्यातून 31 संघ 186 विद्यार्थी 30 मार्गदर्शक प्राध्यापक उपस्थित होते. विविध क्षेत्रातील 16 परीक्षकांनी या सर्व स्पर्धेतील प्रकल्पांचे परीक्षण केले. स्पर्धक विद्यार्थी, प्राध्यापकांनी अभिप्रायातून आयोजनाबद्दल,व्यवस्थे बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. मेटलासा प्रा.ली पुणे चे उपाध्यक्ष उपेंद्र भाळवणीकर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. अभय जेरे व उपेंद्र भाळवणीकर, संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरवण्यात आले. स्पर्धेचे निरीक्षक प्रसाद दिवाण, उमेश राठोड, प्रा.अरुण देसाई यांनी केले. प्रा. अजय कापसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. श्रुती काशीद यांनी केले.
स्पर्धेतील विजेते संघ
नर्डदेव- श्रीकृष्ण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, तमिळनाडू, टीम पीओव्ही- डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेंगलुरू, सोर्सेसर-पानिपत इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, हरियाणा, कॅपॅटीव्हेटर 3.0, महाराष्ट्र अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संगमनेर,महाराष्ट्र., प्रवाह-29, मिहीर्स एमआयटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग आळंदी देवाची,महाराष्ट्र., एलडी-हकॉस, चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तमिळनाडू., मॅनिफेस्ट कोडर, तमिलनाडु चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तमिळनाडू.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article