Ratnagiri News : पडवे जि.प. गटाचा विकास ठाकरे शिवसेना, महाविकास आघाडीच करु शकते : सचिन बाईत
२४ तास उपलब्ध उमेदवार म्हणून सचिन बाईतांची ओळख
गुहागर : आमदार भास्कर जाधव यांच्यामार्फत रस्त्याची कामे मंजूर झाली त्यामधील ९० टक्केपेक्षा जास्त कामे पडवे जि. प. गटामध्ये पूर्णत्वास गेली आहेत. यामुळे या गटाचा विकास केवळ ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीच करू शकते, असे प्रतिपादन महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे उमेदवार सचिन बाईत यांनी येथे केले.
पडवे जि.प. गटासाठी २४ तास उपलब्ध असलेला उमेदवार म्हणून सचिन बाईत यांनी नावलौकीक मिळवला आहे. या गटात कोणतीही घटना घडल्यावर सर्वात पहिली हजेरी बाईत यांची होताना दिसते. मग तो पाचेरीआगर येथील गणेशोत्सवावेळीचा अपघात असो, आबलोली येथीलच अवघड वळणामधील अपघात असो, प्रत्येकाच्या सुख-दुःखातील मदतीचा हात बाईत यांच्याकडून जात आहे.
आपल्या उद्योग व्यवसायातून येथील परिसरातील बचत गटालाही मार्गदर्शन करून उद्योग व्यवसायाला प्रोत्साहित करण्याचे काम त्यांनी केले आहे. पाणी टंचाई भागात पावसाळा संपताना १०० बंधारे बांधण्याचाही अभिनव उपक्रम राबवला. आवश्यक ठिकाणी बोअरवेल घेऊन तेथील लोकांना दिलासा देण्याचेही काम केले. नुकतेच सडेजांभारी येथील ग्रामदेवता मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचेही काम केले आहे. या गटामध्ये गणेशोत्सव विसर्जन घाट उभारणीचेही काम सचिन बाईत यांनी केले. पडवे व परिसरातील गावातील मच्छीमार महिला आबलोलीसारख्या मुख्य बाजारपेठेमध्ये माछी विक्रीसाठी येत असतात. त्यांना जागा देऊन त्यांच्या माछीव्यवसायाला बाईत कायम सहकार्य करत आहेत.