For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वार्थ नसलेली माणसेच समाजासाठी काहीतरी करू शकतात

10:21 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वार्थ नसलेली माणसेच समाजासाठी काहीतरी करू शकतात
Advertisement

आमदार विठ्ठल हलगेकरांचे प्रतिपादन: हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती क्षेत्रावरील प्रवेशद्वाराचे थाटात उद्घाटन

Advertisement

वार्ताहर /जांबोटी

दातृत्वाची किंमत करता येत नाही. दातृत्वासारखे दुसरे दान नाही. आई-वडिलांचा आदर्श डोळ्dयासमोर ठेवून त्यांचा वारसा पुढे चालविणे हे मोलाचे कर्तव्य असते. समाजाच्या व आई, वडील यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आई-वडिलांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी कार्य करणे ही पुण्याईची गोष्ट आहे. ज्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही अशी माणसेच समाजासाठी काहीतरी करू शकतात. तोच आदर्श हभप मारुती मोरे यांनी घेऊन आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्रावर स्वखर्चाने प्रवेशद्वाराची उभारणी करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.

Advertisement

ते रविवारी हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर चिपळूण येथील बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर हभप मारुती मोरे (रा. मोदेकोप) यांनी आपले आई-वडील कै. हभप तुळजाप्पा मोरे व आई कै. हभप लक्ष्मीबाई मोरे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या नूतन कमानीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्र कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर होते. प्रारंभी देवस्थान कमिटीचे माजी सचिव सुनील चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. त्यानंतर जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई, स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र कमिटीचे कार्याध्यक्ष नेताजी घाडी, उपाध्यक्ष नानू घाडी यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत अध्यक्ष किरण गावडे, सीआरपीएफ कमांडो कॅम्प तोराळीचे डीआयजी एम. एल. रवींद्र, भाजपा महिला मोर्चाच्या कार्यदर्शी धनश्री सरदेसाई-जांबोटीकर, हभप मारुती मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते देवस्थान प्रवेशद्वार कमानीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बळीराम मोरे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

मान्यवरांचा सत्कार

यावेळी स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र हब्बनहट्टी येथे 12 लाख रुपये खर्चून प्रवेशद्वार उभारून देवस्थानच्या वैभवात भर घातल्याबद्दल देवस्थान कमिटीतर्फे हभप मारुती मोरे यांचा व त्यांच्या सुविद्य पत्नी हभप मनीषा मोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांचाही शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध संघ संस्था व मित्र परिवारातर्फे मोरे कुटुंबीयांचा सत्कार केला. प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक अजित सावंत उपस्थित होते. यावेळी किरण गावडे, बळीराम मोरे, डीआयजीएमएल रवींद्र, लक्ष्मण कसर्लेकर, मारुती मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे जि. पं. माजी सदस्य नारायण कार्वेकर, निंगोजी पार्लेकर, सुधाकर गावडे, नागुर्डा ग्रा.पं. अध्यक्षा पूजा चाळगुंडे, सदस्य कल्लाप्पा गावडे, वासू ओलमणकरे, स्वाती मोरे, गोविंद गावडे, उदय जुगळे, रामलिंग कुलमे, तुकाराम कुलमे, प्रा. भगवंत दळवी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक बबन पेडणेकर व सुनील चिगुळकर यांनी केले. आभार धनश्री सरदेसाई यांनी मानले.

Advertisement
Tags :

.