For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Politics | जयसिंगपूरकरांचा आमच्या आघाडीलाच कौल मिळेल : माजी खासदार राजू शेट्टी

05:06 PM Nov 21, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur politics   जयसिंगपूरकरांचा आमच्या आघाडीलाच कौल मिळेल   माजी खासदार राजू शेट्टी
Advertisement

                               जयसिंगपूर विकास आघाडीचा शहरासाठी व्यापक आराखडा

Advertisement

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या जयसिंगपूर शहर विकास पॅनेलच्या माध्यमातून शहराला विकासाच्या दृष्टीकोनातून सक्षम पर्याय मिळाला आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहरातील जनता या आघाडीसोबत राहिल असा विश्वास आघाडीचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत दिला.

जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून राजू शेट्टी, उद्यानपंडित गणपतराव पाटील व माधवराव घाटगे यांनी एकत्र येऊन सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीसमोर नगराध्यक्ष पदासह सक्षम पर्याय दिले आहेत. सुदर्शन कदम यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ ते १३ मध्ये आघाडीच्या माध्यमातून सर्व उमेदवार करण्यात आलेले आहेत.

Advertisement

जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील आरक्षण पडलेल्या जमिनीची मुदत संपली आहे, त्या सर्व जमिनी परत करणे, शहरातील गार्डन अद्यावत करणे, नगरपालिका शाळा दर्जेदार करणे, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविणे, सार्वजनिक शौचालय सुविधा, आधुनिक भाजीमंडई, शहराला स्वच्छ व मुबलक पाणी, झोपडपट्टी नियमितीकरण, आरोग्य सुविधा, पालिकेच्या तसेच राज्य शासनाच्या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून देण्यासह टक्केवारी व भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका आणि शहराचा सर्वांगीण विकास या मुद्यांवर निवडणूक लढवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांचे भाषण झाले.

यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, गुरूदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, राजवर्धन नाईक निंबाळकर, नीता माने, डॉ. महावीर अक्कोळे, सर्जेराव पवार, विजय भोजे, शेखर पाटील, अशोकराव कोळेकर, राहूल घाटगे, नितीन बागे चंद्रकांत जाधव यांच्यासह आघाडीचे सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.