अनोख्या गावात केवळ एका इसमाचे वास्तव्य
एकेकाळी 120 लोकांनी बहरलेले होते गाव
भारताच्या कुठल्याही गावात गेला तर तेथे छोट्या शहरासारखीच लोकसंख्या दिसून येईल. परंतु जगात काही अशी गावं आहेत, जेथे अत्यंत कमी संख्येत लोक राहतात. एका गावात सध्या केवळ एकच इसम राहतो, परंतु कधीकाळी येथे 120 हून अधिक नागरिक राहत होते.
हे गाव पोर्तुगालमध्ये आtन तेथे केवळ एकच इसम राहत आहे. या गावाचे नाव तलासनल असून ते मध्य पोर्तुगालमध्ये पर्वतांदरम्यान वसलेले आहे. या गावात जॉर्ज नावाचा एक वृद्ध इसम राहत आहे. 1900 च्या काळात या गावात 120 हून अधिक लोक राहत होते. परंतु हळूहळू हे सर्व जण गाव सोडून गेले, हे गाव अत्यंत दूर आणि एकांतात वसलेले असल्याने येथे आवश्यक सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. याचमुळे लोक शहरांमध्ये राहण्यासाठी निघून गेले. 1980 पर्यंत केवळ 2 नागरिक राहिले होते. आता जॉर्ज एकटेच गावात राहत आहेत.
जॉर्ज यांचा स्वत:चा एक बार आहे, गावात पर्यटय येतात आणि या बारमध्ये मद्यपान करतात, तर जॉर्ज त्यांना कहाण्या ऐकवितात. केवळ जॉर्जच्या घरातच मेलबॉक्स आहे.