कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur water supply: आजपासुन शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा, कुठे, कसा होईल पुरवठा?

12:29 PM Aug 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाणीपुरवठा विभागाकडून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन

Advertisement

By : दीपक जाधव

Advertisement

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीन पंपापैकी एक पंप नादुरूस्त झालेने शहरातील नागरीकांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे सदरचा पंप कार्यान्वित होईपर्यंत पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भागातील नागरीकांना महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये गुरुवार (दि. 28) म्हणजे आजपासून एक दिवस आड करण्यात येणार आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. शहराची जीवनदायीनी पंचगंगा नदी शहराला वेढा घालून दुथंडी भरून वाहत आहे. तरीदेखील कोल्हापूर महानगरपालिकेच्या गलथान नियोजन शून्य कारभारामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामूष्की पालिकेवर आली आहे. 

गुरूवार दि. 28 ऑगस्टपासून या भागात होईल एक दिवस आड पाणी पुरवठा

ए, बी, वॉर्ड

ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण पुईखडी परिसर, सानेगुरूजी वसाहत परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक परिसर आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, जरगनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर.

साळाखेनगर परिसर, राजीवगांधी नगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, मोरेमानेनगर, आयटीआय परिसर, नाळे कॉलनी, जोगेश्वरी कॉलनी रायगड नाका परिसर, बालिजापार्क, रामानंदनगर, जवाहर नगर परिसर, शिवाजीपेठ परिसर, चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर.

उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, संपूर्ण मंगळवार पेठ परिसर, विजयनगर परिसर, संभाजीनगर परिसर, टिंबर मार्केट परिसर, मंडलिक वसाहत परिसर, मंगेशकर नगर परिसर, सुभाषनगर पंपींगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, वाय पी पोवार नगर परिसर, मिरजकर तिकटी परिसर, इत्यादी.

शुक्रवार दि. 29 ऑगस्टपासून या भागात होईल एक दिवस आड पाणी पुरवठा

ई वॉर्ड

संपूर्ण राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली परिसर, मातंग वसाहत परिसर, यादवनगर परिसर, उद्यमनगर परिसर, शास्त्राrनगर परिसर, राजारामपुरी एक्स्टेन्शन, टाकाळा परिसर, पांजरपोळ परिसर, सम्राटनगर परिसर, दौलतनगर परिसर, शाहूनगर परिसर, राजेंद्रनगर परिसर, इंगळे मळा परिसर.

वैभव सोसायटी, शांतीनिकेतन परिसर ग्रीनपार्क परिसर, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारपेठ परिसर, शिवाजीपार्क परिसर, रूईकर कॉलनी परिसर, राजीवगांधी वसाहत परिसर, लोणार वसाहत परिसर, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत इत्यादी.

तरी संबंधीत भागातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे अवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWSkolhapur water supply latest updatekolhapur water supply news today live
Next Article