या आठवड्यात एकाच कंपनीचा येणार आयपीओ
13 कंपन्यांचे समभाग आठवड्यात होणार सूचीबद्ध : 5 मेन बोर्डवर होणार लिस्ट
वृत्तसंस्था, मुंबई
सोमवारी सुरु झालेल्या आठवड्यामध्ये एकाच कंपनीचा आयपीओ शेअरबाजारात खुला होणार असून 13 कंपन्या शेअर बाजारात नव्याने सूचीबद्ध होणार आहेत. नव्या आठवड्यामध्ये वेदांत पॉलिफॅब्स यांचा आयपीओ खुला होणार आहे. 13 कंपन्यांपैकी 5 कंपन्या मेन बोर्ड प्रकारात सूचीबद्ध होणार आहेत.
वेदांत पॉलिफॅब्स: सदरच्या कंपनीचा आयपीओ सोमवार 2 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 4 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. कंपनी या आयपीओतून 56.68 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने आयपीओसाठी 88 ते 94 प्रतिसमभाग अशी इश्यू किंमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 1200 समभागांचा समावेश असणार आहे. कंपनीचा समभाग एनएसई एसएमईवर 9 नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध होऊ शकतो.
अँटाला इंडस्ट्रीज यांचा आयपीओ 29 ऑक्टोबरला खुला झाला होता, जो 2 नोव्हेंबरला बंद झाला. 63 ते 67 रुपये इश्यू किंमत निश्चित करण्यात आली असून एका लॉटमध्ये 2000 समभागांचा समावेश असणार आहे. कंपनीचा समभाग बीएसई एसएमईवर 5 नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध होऊ शकतो.
बॉम्बे कोटेड अँड स्पेशल स्टिल्स यांचा आयपीओ 29 ऑक्टोबरला खुला झाला असून 2 नोव्हेंबरला बंद झाला. 183 कोटी रुपये आयपीओअंतर्गत उभारले जाणार असून कंपनीने इश्यू किंमत 78 ते 82 रुपये प्रतिसमभाग अशी निश्चित केली आहे. एका लॉटमध्ये 182 समभागांचा समावेश असणार आहे. कंपनीचा समभाग एनएसई आणि बीएसईवर 5 नोव्हेंबरला सूचीबद्ध होऊ शकतो.
जॉन्सनकॅब इलेक्ट्रिकल्स ही कंपनी आपल्या आयपीओतून 56.02 कोटी रुपये उभारणार आहे. 30 ऑक्टोबरला खुला झालेला आयपीओ 3 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. 190 ते 200 रुपये प्रतिसमभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 600 समभागांचा समावेश असणार आहे. बीएसई व एसएमईवर 6 नोव्हेंबर रोजी समभाग सूचीबद्ध होऊ शकतो. एचजीएस (इंडिया) यांचा आयपीओ 34.56 कोटी रुपयांचा असणार असून 3 नोव्हेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. 114 ते 120 रुपये प्रतिसमभाग अशी किंमतही निश्चित करण्यात आली असून एका लॉटमध्ये 1200 समभाग असतील असे कंपनीने सांगितले आहे. एनएसई, एसएमई यावर कंपनीचा समभाग 6 नोव्हेंबरला सूचीबद्ध हेऊ शकतो.
व्हेक्ट्रास एनप्रोकॉन, मॅक्सवेल इंजिनियरिंग सोल्यूशन
व्हेक्ट्रास एनप्रोकॉन यांचा आयपीओ 30 तारखेला खुला झाला असून 3 नोव्हेंबरला बंद होणार आहे. 53.05 कोटी रुपये कंपनी आयपीओतून उभारणार असून 99 ते 105 अशी इश्यू किंमत असणार आहे. 1200 समभाग एका लॉटमध्ये असणार आहेत. 6 नोव्हेंबरला समभाग बाजारात सूचीबद्ध होऊ शकतो. मॅक्सवेल इंजिनियरिंग सोल्यूशन ही कंपनी आयपीओतून 57.64 कोटी रुपये उभारणार असून यामध्ये 3 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. 150 ते 158 रुपये प्रतिसमभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली असून एका लॉटमध्ये 800 समभागांचा समावेश केलेला आहे. 6 नोव्हेंबर रोजी कंपनीचा समभाग सूचीबद्ध होऊ शकतो.
हे समभाग होणार सुचीबद्ध
3 नोव्हेंबरला बीएलएस पॉलिमर्स, एसएफसी एन्व्हार्यन्मेंटल टेक्नॉलॉजीस यांचे समभाग बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. याचदिवशी बीएसई, एसएमईवर विसकॉन इंडस्ट्रीज यांचा समभाग सूचीबद्ध होणार आहे. 4 नोव्हेंबरला एम के सन्स फाईन ज्युवेल्स, कार्वर रोबोवेल्ड, अजवा प्रोजेक्टस यांचे समभाग सूचीबद्ध होतील. 5 नोव्हेंबरला बॉम्बे कोटेड व अँटाला इंडस्ट्रीज यांचे समभाग सूचीबद्ध होतील. 6 तारखेला जॉन्सकॅब, व्हेक्ट्रास, एचसीजीएस व मॅक्सवेल यांचे समभाग सूचीबद्ध होतील.
