केवळ ‘निगेटिव्ह’ लोकांनाच मिळते खाद्य
पिऊन डिप्रेशन येईल असे ड्रिंक देणारा कॅफे
प्रत्येक माणसाचा स्वत:चा स्वभाव असतो, प्रत्येक जण कुठल्याही स्थितीत सकारात्मक राहू इच्छितो, तर काही जण कुठल्याही स्थितीत नकारात्मक राहत असतात. सर्वसाधारणपणे अशा लोकांपासून दूर राहण्यातच भले असते. परंतु तुम्हाला डिप्रेशनमध्ये आणेल असे एक ठिकाण आहे. तेथे केवळ नकारात्मक लोकांचेच स्वागत केले जाते. येथे अशा लोकांनाच सन्मान दिला जातो आणि त्यांच्या नकारात्मकतेबद्दल आणि नैराश्याबद्दल कुणालाच आक्षेप नसतो.
सर्वांनी नेहमी सकारात्मक रहायला हवे असे आपण वारंवार ऐकत असतो. परंतु एक कॅफे केवळ निगेटिव्ह लोकांसाठी निर्माण करण्यात आला आहे. जे सकारात्मक विचार बाळगत नाहीत, त्यांना हा कॅफे अत्यंत सन्मानपूर्वक वागवत असतो. हा कॅफे जपानची राजधानी टोकियो असून येथील शिमोकिटझावा जिल्ह्यात निर्माण या कॅफेचे नाव मोरी आउची आहे.
नकारात्मक मानसिकतेचे स्वागत
मोरी आउची हे ठिकाण नकारात्मकता अणि नैराश्याला वाईट मानत नाही. मी स्वत: देखील नकारात्मक विचार बाळगत असतो. अशा स्थितीत स्वत:सारखा विचार करणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण निर्माण केले आहे. महामारीदरम्यान जे लोक नकारात्मक विचार करतात ते अधिक संवेदनशील असल्याची जाणीव झाली. अशा स्थितीत अशा लोकांसाठी मी छोटासा कॅफे सुरू केला आहे. सकारात्मक असणे चांगली बाब आहे, परंतु नकारात्मक असणे तितके वाईट नसल्याचे कॅफेच्या संस्थापकाने म्हटले आहे.
डिप्रेशन आणणारा मेन्यू
हे ठिकाण नकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांसाठी एक आरामाचे ठिकाण आहे. येथील इंटिरियर याच्या मालकानेच तयार केले आहे. येथे लोकांसाठी प्रायव्हेट रुम्स देखील तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून ते कुणाच्याही नजरेत न येता आरामात राहू शकतील. येथे उपलब्ध खाद्यपदार्थांची नावे अत्यंत मोठी आणि विचित्र आहेत. येथील ड्रिंक्स तुलनेत खराब रंगाची आणि वाईट चवीची असतात.