For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

२०२४ ला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच निवडून येतील

04:29 PM Nov 17, 2023 IST | अनुजा कुडतरकर
२०२४ ला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच निवडून येतील
Advertisement

महाविजय अभियानचे प्रमुख आमदार . श्रीकांत भारती यांचे प्रतिपादन

Advertisement

सावंतवाडी |प्रतिनिधी

सन 2024 लोकसभा ,विधानसभा महाविजय अभियान महायुतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. भाजप निश्चितपणे राज्यात 288 विधानसभा व 48 लोकसभा निवडणुका लढवण्याच्या दृष्टीने सज्ज झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची आहे. परंतु , ते यापेक्षाही मोठे व्हावेत आणि देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत अशी इच्छाही आहे. मात्र , सन 2024 महाविजय अभियान होणार असून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच असणार आहेत. असे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा लोकसभा 2024 महाविजय अभियानचे प्रमुख आमदार श्रीकांत भारती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार राजन तेली ,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,डॉ. अमेय देसाई, रणजित देसाई ,श्वेता कोरगावकर, श्री चव्हाण आदी उपस्थित होते. श्री भारती पुढे म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्यात येणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळायला हवे अशी आमची भूमिका आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले . यावेळी कार्यकर्ते दिलीप भालेकर व केतन आजगावकर उपस्थित होते. यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच सदस्यांचा सत्कार श्री भारती यांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.