या शहरात केवळ मातीची घरं
6-7 मजली इमारती देखील मातीने निर्मित
एका शहरात सर्व बहुमजली इमारती मातीने तयार करण्यात आल्याचे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? अशाप्रकारचे शहर असू शकते याची कल्पनाही देखील कुणी केली नसेल. परंतु एका शहरात 6 मजली तसेच 7 मजली इमारती असून त्यांच्या निर्मितीकरता सिमेंट नव्हे तर मातीचा वापर करण्यात आला आहे.
हे शहर मध्यपूर्वेतील देश येमेनमधील आहे. येमेनच्या हद्रामौत क्षेत्रात शिबाम शहर असून येथील सर्व इमारती मातीने निर्माण करण्यात आल्या आहेत. या शहराला ‘वाळवंटातील मॅनहॅट्टन’ देखील म्हटले जाते. हे शहर जवळपास 1700 वर्षे जुने असून 1982 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला होता. येथे मातीने निर्मित अनेक बहुमजली इमारती देखील आहेत. शिबाममध्ये केवळ उंच इमारती नसून त्यांचे डिझाइन देखील अत्यंत आकर्षक आहे.
या शहराच्या सुरक्षेची देखील पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. शहर एका आयताकृती ग्रिडमध्ये असून एका भिंतीद्वारे सुरक्षित करण्यात आले आहे. ही प्रणाली रहिवाशांना शत्रूच्या हल्ल्यांपासून वाचविणारी आहे. मातीने निर्मित या बहुमजली इमारती पाहून कुणीच चकित होतो. शिबाम केवळ एक शहर नसून मानवी संस्कृतीचे एक अनोखे उदाहरण देखील आहे. सध्या या शहरात सुमारे 7 हजार लोकांचे वास्तव्य आहे.