For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : साताऱ्यात कानाकोपऱ्यात फक्त 'दादा'

04:56 PM Jan 30, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   साताऱ्यात कानाकोपऱ्यात फक्त  दादा
Advertisement

                                   साताऱ्यातून उसळली दादांविषयीची हळहळ

Advertisement

सातारा : सातारा शहरात कालपासून एकच विषय, एकच चर्चा आणि एकच नाव सतत कानावर पडत होते "दादा". राजकारणाशी कधीही फारसा संबंध नसलेले सामान्य नागरिक, हॉटेलात चहा पिणारे ज्येष्ठ, टपरीवर उभे तरुण, चौकात गप्पा मारणारे कामगार.... प्रत्येकाच्या ओठावर एकच भावना होती "देवमाणूस गेला. दादांनी इतक्या लवकर जायला नको होते."

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारा, फटकळ बोलणारा पण तितकाच मिश्किल, हजरजबाबी आणि दिलदार स्वभावाचा नेता आज कायमचा हरपल्याची तीव्र जाणीव साताऱ्यातील प्रत्येक चौकात, प्रत्येक हॉटेल-टपरीवर व्यक्त होत होती. "राजकारणात एवढी उंची सर्वांनाच मिळत नसते, ती आपल्या कर्तृत्वाने मिळवावी लागते" असे बोलणारे दादा आज त्यांच्या कार्यामुळेच लाखो सातारा शहरात लागलेले आदरांजलीचे फ्लेक्स.मनात अढळ स्थान मिळवून गेले.

Advertisement

दादा हे केवळ बारामतीचे नव्हते, तर राज्याचे होते, अशी भावना जनसामान्यांतून व्यक्त होत होती. त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवत राज्याच्या विकासासाठी काम केले. अशा निर्भीड, समाजाभिमुख आणि माणुसकी जपणाऱ्या नेतृत्वाची उणीव महाराष्ट्राला कायम जाणवेल,अशी भावना सर्वत्र दिसून येत होती. दादांवर अंत्यसंस्कार पार पडले. त्यावेळी उसळलेला जनसागर ही दादांनी आयुष्यभर केलेल्या कामाची खरी पोचपावती होती. बारामतीकडे जाणारे सर्व मार्ग बंद पडले होते. दहा-दहा किलोमीटरपर्यंत बाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

रस्तेच नव्हे तर बारामतीच्या आकाशातही हेलिकॉप्टरच्या रांगा पाहायला मिळाल्या. एवढे प्रेम, एबढी आपुलकी दादांनी केवळ आपल्या समाजकार्यातून कमावली होती. दादा नेहमी म्हणायचे, "अरे लेक हो, भांडत बसू नका. खैर धरू नका. राजकारणापलीकडे जाऊन लोकांसाठी काम करा. पैसा, प्रतिष्ठा काय कामाची? माणूस गेला की त्याने केलेले कार्यच लोकांच्या लक्षात राहतं." आज त्यांचे हेच शब्द त्यांच्याबर अक्षरशः लागू झाले आहेत.

"मी कामाचा माणूस आहे, मला काम करायला आवडते", असे सांगणारे दादा शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिले. संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाची अनेक स्वप्ने त्यांनी प्रत्यक्षात उत्तरखून दाखवली. त्यामुळेच आज समाजातील अगदी तळागाळातील माणसापासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्वाकडून अश्रूनी भरलेली श्रद्धांजली वाहिली जात आहे. साताऱ्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून एकच हळया आवाज उमटत होता असा नेता पुन्हा होणे नाही... दादा परत या, दादा परत या....

Advertisement
Tags :

.